Rajesh Kumar : सद्गुरूंच्या सल्ल्यावरून अभिनेता राजेश कुमारनं शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे तो कर्जबाजारी झालेला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – २०१७ मध्ये, अभिनेते राजेश कुमारनं अभिनय सोडून बिहारमधील त्याच्या मूळ गावी, गया येथे शेती करण्यास सुरुवात केली. हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक असला तरी, राजेशसाठी तो आध्यात्मिक गुरू सद्गुरूंनी दिलेला आदेश होता. पुढील पाच वर्षांत, राजेशवर २ कोटी रुपयांचं प्रचंड कर्ज झालं आणि त्याच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. अभिनेत्यानं आपल्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपालादेखील विकला. याबद्दल अभिनेत्यनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
राजेश कुमारला आलेलं अपयश
राजेश कुमार नं सांगितलं की, तो आधीपासून सद्गुरूंचा अनुयायी नव्हता, पण नंतर झाला. सद्गुरूंच्या शब्दांचा त्याच्यावर प्रभाव पडला आणि त्यानं सर्व काही सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. राजेश कुमार म्हणाला की, ”रॅली फॉर रिव्हर्स’ मध्ये सद्गुरू सतत एक गोष्ट सांगत होते, ‘मला तुमच्या राज्यातील १०० तरुण द्या, मी शेतीचे स्वरूप बदलून दाखवेन. पण तीन वर्षे मला विचारू नका की, माझ्या भविष्याचं काय?’ जेव्हा मी माझ्या गावी पोहोचलो, तेव्हा मला अचानक त्या वाक्याचा अर्थ समजला.’
‘मला जाणवलं की, शेतकऱ्यांना कीटकनाशकं वापरू नका असं सांगण्यापेक्षा, शेतात उतरून मूळ समस्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी शेतकरी झालो. मी बागायती शेतीचा प्रयत्न केला आणि त्यात मी अपयशी ठरलो. पण सद्गुरूंच्या कृपेमुळे मी याला अपयश म्हणणार नाही. मला याचं आता काही वाटत नाही, कारण मला याला यश किंवा अपयश म्हणायचं नाही. यातून मला खूप काही शिकायला मिळालं, जे इतर कुठे शिकता आलं नसतं’
Aayush Bhide : ‘तो खूप वाईट काळ होता’, करोनात आई-वडिल गेले, न खचता आयुषनं पूर्ण केलं बाबांचं स्वप्न, सांगितला कठीण काळ ‘मी रोपं लावली आणि जवळपास ३५ वर्षांनंतर त्या भागात भीषण महापूर आला आणि सगळं वाहून गेलं. तरीही मी हार न मानता पुन्हा १५,००० झाडे लावली, पण करोना काळात सर्व प्रयत्न वाया गेले. मी पुन्हा झाडे लावली, पण यावेळी पाणीटंचाईचा फटका बसला. हा माझा शेवटचा प्रयत्न होता. माझ्याकडे जे काही पैसे उरले होते, त्यातून मी विहिरीसाठी ५०० फूट खोल ड्रिलिंग केलं, पण पाण्याचा एक थेंबही लागला नाही. या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. अध्यात्मामुळे मला कधीही काळजी, डिप्रेशन, संताप किंवा चिडचिड या गोष्टी जाणवल्या नाहीत. काहीच घडत नव्हतं आणि ते मला दिसत होतं, तरीही माझे प्रयत्न थांबले नाही. हेच अध्यात्म आहे.’ असं राजेशनं पुढे सांगितलं. ‘द मिस्टिक वर्ल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश बोलत होता.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा