Varsha Usgaonkar : सिनेमाच्या सेटवर वर्षा उसगांवकर आणि अश्विनी भावे एकमेकींसोबत बोलायच्या नाहीत. एका मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि अश्विनी यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. वर्षा उसगांवकर आणि अश्विनी भावे एकमेकींच्या स्पर्धक होत्या. त्यांच्यात मैत्री कधीच नव्हती. अशातच आता वर्षा उसगांवकर यांनी अश्विनी भावे यांच्यासोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.
अश्विनी भावे यांच्याबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
मुलाखतीदरम्यान वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘अश्विनी भावे आणि माझ्यात कॅट फाइट नव्हती. पण, आमच्यात सगळं काही चांगलं पण नव्हतं. आम्ही अनेक सिनेमे एकत्र केले. आम्ही ‘हनिमून’ हा हिंदी चित्रपट एकत्र केला. त्यात ती माझी बहीण होती. सिनेमात आम्ही एकमेकींवर खूप प्रेम करायचो. पण, तरी आमच्यातलं ते प्रेम दिग्दर्शकाला दिसत नव्हतं. ती एका कोपऱ्यात आणि मी एका कोपऱ्यात बसायचे. याचं कारण काय? तर काहीच नाही. आमच्यात भांडणं नव्हती. पण, आम्ही एकमेकींच्या स्पर्धक होतो.’
वर्षा उसगांवकर यांचा सिनेसृष्टीतील भन्नाट किस्सा, दिग्दर्शकालाही कळलेलं… शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलेलं?
‘अश्विनीनं ऋषी कपूर यांचा ‘हिना’ सिनेमा साइन केला. त्यामुळे मला उगाचच एक तेढ निर्माण झाली. हे स्वतःला समजतात काय. अश्विनी काय समजते स्वतःला आणि ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचा आणि माझ्याशी त्याची एवढी काही मैत्री नव्हती. त्यामुळे मला राग यायचा. अश्विनीत काय असं खास आहे, ज्यामुळे हा तिच्याशी बोलतो. त्यामुळे तेढ निर्माण झाली.’
Sneha Wagh : दोन लग्न अन् घटस्फोट, अध्यात्माकडे वळली मराठमोळी अभिनेत्री, वृंदावनामुळे बदललं आयुष्य; म्हणाली, ‘कोणत्याही नात्याची गरज नाही’ ‘फोटोशूट होतं तेव्हाही ती एकीकडे मी एकीकडे. नाही म्हटलं तरी असं झालं. का झालं तर काही कारणच नाही. फक्त काहीतरी लिहून आलं मग माझा इगो दुखावला गेला. तिचा इगो दुखावला गेला. नंतर काही वर्षांनी तिचं लग्न झालं. आता जेव्हा एकमेकींना भेटतो, तेव्हा वाटतं किती बालीशपणा होता. ती कॅट फाइट नव्हती, पण प्रोफेशनल जेलसी होती. अल्लडपणा होता. त्या वयात ते होतं, असं मी म्हणेन. पण आता मला अश्विनीबद्दल कौतुक वाटतं. ती तिच्या युट्युबवर भाज्या दाखवत असते. मी तिचे व्हिडिओ पाहते लाइक करते.’ असं वर्षा उसगांवकर यांनी शेवटी सांगितलं. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर बोलत होत्या.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा