Tragedy of chandgude family death in khavdya dongar circle of family discord and tragic death from 6 years ago; आयफोन नव्हे, ६ वर्षांपूर्वीची ती एक घटना मृत्यूला कारणीभूत? चांदगुडे कुटुंबात नक्की काय सुरू होतं? नातेवाईकांच्या चर्चेने वेगळी कलाटणी
Tragedy of chandgude family death in khavdya dongar circle of family discord and tragic death from 6 years ago; आयफोन नव्हे, ६ वर्षांपूर्वीची ती एक घटना मृत्यूला कारणीभूत? चांदगुडे कुटुंबात नक्की काय सुरू होतं? नातेवाईकांच्या चर्चेने वेगळी कलाटणी
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर आई-वडिलांसह कुणाल चांदगुडे या तरुणाने दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटनेत आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या केवळ आयफोनच्या वादातून झाली नसून, या कुटुंबात गेल्या ६ वर्षांपासून सतत कौटुंबिक कलह सुरू असल्याची माहिती घाटी रुग्णालयात जमलेल्या नातेवाईकांकडून समोर आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी कुणाल मुरलीधर चादगुडे (वय १९) याने आत्महत्या केली असून वडील मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८) व आई संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२, रा. अक्षयबन सोसायटीसमोर, झाल्टा फाटा, ता. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. कर्जत पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) असे डोंगरावरून दरीत पडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मुरलीधर व संगीता चांदगुडे यांना दोन मुले होती. मुरलीधर हे व्यवसायाने ट्रकचालक होते, तर संगीता गृहिणी होत्या. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा एका आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तेव्हापासूनच घरात सतत खटके उडू लागले होते. घरातील याच वाद-विवादांमुळे आणि मानसिक तणावामुळे मुरलीधर हे कामाच्या निमित्ताने का होईना, सातत्याने घराबाहेर राहू लागले. ते गेल्या ३ महिन्यांपासून बाहेरगावीच होते. दोन दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते; मात्र घरी आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात आणि कुणालमध्ये खटके उडाले होते, असं नातेवाईकांकडून बोललं जात आहे.
तणावाचे कारण जुनेच?
यापूर्वी सोशल मीडियावर कुणालने आयफोन आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याचा दावा केला जात होता. मात्र, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी आधीच या आयफोनच्या अफवेचे खंडन केले होते. ६ वर्षांपूर्वी मोठ्या भावाचा झालेला मृत्यू, कौटुंबिक तणाव आणि ३ महिन्यांनंतर घरी परतलेल्या वडिलांशी झालेला वाद, या सर्व जुन्या व नव्या कारणांच्या एकत्रित तणावातूनच कुणालने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुर्दैवाने, या घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही करुण अंत झाल्यामुळे घरातील खरी वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता कोणताही साक्षीदार शिल्लक राहिलेला नाही.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा