दिव्यांग विद्यार्थ्यांची दैना, व्हायरल व्हिडिओची ओमराजेंकडून दखल, शिक्षकांना सूचना – mp omraje nimbalkar visits school after viral video of disabled students
दिव्यांग विद्यार्थ्यांची दैना, व्हायरल व्हिडिओची ओमराजेंकडून दखल, शिक्षकांना सूचना – mp omraje nimbalkar visits school after viral video of disabled students
खासदार ओमराजेंच्या मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दुरवस्थेचा व्हिडिओ समोर आला होता. ज्यामुळे शाळा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पुरेसे अन्न आणि पिण्याच्या पाण्याचीही अपुरी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत होर्टी येथील अस्थिव्यंग निवासी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी ओमराजेंनी शाळेतील विविध सुविधांची पाहणी करत पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळा अशा सूचनाही दिल्या.