Headlines

राहुल गांधींचा कार्यक्रम 'छात्रों की गूंज' नव्हे, 'पैसों की गूंज'!:गर्दी जमवण्यासाठी 10 कोटींचा खेळ, भाजपचा काँग्रेसवर घणाघात; पुराव्यांसह खळबळजनक आरोप




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून आता मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नसून, काँग्रेसने पैसे देऊन गर्दी जमवण्यासाठी आखलेला ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ आहे, असा अत्यंत खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्हिडिओ पुराव्यांसह हा दावा केला आहे. ‘छात्रों की गूंज’ नव्हे, ही ‘पैसों की गूंज’ पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या प्रचार पद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा कोणताही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत नाहीये. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी आणि समाजमाध्यमांवर वातावरणनिर्मिती करण्यासाठी काँग्रेसकडून कोट्यवधी रुपये वाटले जात आहेत. हा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम नसून केवळ ‘पैसों की गूंज’ आहे.” इन्फ्लुएन्सर्सना ३५ हजारांची ऑफर आणि १० कोटींचे बजेट नवनाथ बन यांनी यावेळी काही व्हिडिओ समोर आणत काँग्रेसचे ‘रेट कार्ड’ उघड केल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींना (इन्फ्लुएन्सर्सना) कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी, प्रवासाच्या खर्चासाठी आणि इव्हेंटचे प्रमोशन करण्यासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपयांची थेट ऑफर दिली जात आहे. “जर ३ हजार लोकांना अशाप्रकारे प्रत्येकी ३०-३५ हजार रुपये दिले जात असतील, तर केवळ गर्दी जमवण्यासाठी ९ ते १० कोटी रुपये खर्च केले जात आहेत,” असे बन म्हणाले. राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या पुन्हा ‘रिलाँच’ करण्यासाठी हा कोट्यवधींचा खेळ सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्क्रीनवर काही व्हिडिओ दाखवले.. निधी आला कुठून? परदेशी फंडिंग की भ्रष्टाचार? एवढा प्रचंड पैसा काँग्रेसकडे कुठून आला? यावरही भाजपने शंका उपस्थित केली आहे. “या पैशांच्या स्रोताची अत्यंत सखोल चौकशी झाली पाहिजे. याला काही फॉरेन फंडिंग आहे का? की काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमधील कंत्राटे आणि कमिशनच्या माध्यमातून हा पैसा वळवण्यात आला आहे? यामागे कोणती संस्था किंवा व्यक्ती आहे, हे समोर आले पाहिजे,” अशी मागणी बन यांनी केली. आजपर्यंत सर्वांना ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ माहिती होती, मात्र आता काँग्रेसचे ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ हे नवे मॉडेल समोर आले आहे. राहुल गांधींच्या विचारांवर तरुणांचा खरोखरच विश्वास असेल, तर पैसे देऊन गर्दी जमवण्याची वेळ काँग्रेसवर का आली? याचे उत्तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असे थेट आव्हान नवनाथ बन यांनी दिले आहे. हेही वाचा.. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी राडा: ABVP-NSUI भिडले; विरोधकांकडून भाडोत्री गुंडांचा वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत