अलास्का : अमेरिकेच्या पश्चिम अलास्का भागात एक चार्टर्ड विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि 6 प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान गूडन्यूज बेपासून जवळपास 40 मैल अंतरावरील केप न्यूएनहॅमच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. केप न्यूएनहॅम ही एक वायुदलाची धावपट्टी असून ती दीर्घ अंतरावरील रडारस्टेशनपर्यंत पोहोच प्रदान करते.
