Headlines

पाम सिटीच्या बिल्डरला महारेराचा दणका; ५६.२५ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश


Nagpur News: पाम सिटी प्रकल्पात घरखरेदीदारांना ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा न देणे आणि प्रकल्प अर्धवट ठेवणे या प्रकरणात महारेराने पाम सिटीच्या बिल्डरला खरेदीदारांकडून घेतलेली ५६.२५ लाख रुपयांची रक्कम व्याजासह ६० दिवसांत परत करण्याचा आदेश दिला

पाम सिटी बिल्डर
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर: पाम सिटी प्रकल्पात घराचे स्वप्न पाहणाऱ्या तीन घरखरेदीदारांना महारेराकडून दिलासा मिळाला आहे. ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा न देणे आणि प्रकल्प अर्धवट ठेवणे या प्रकरणात महारेराने अष्टविनायक प्लॅनर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला खरेदीदारांकडून घेतलेली ५६.२५ लाख रुपयांची रक्कम व्याजासह ६० दिवसांत परत करण्याचा आदेश दिला आहे. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी २० ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला.

अनेक वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्ण झाला नाही

करारानुसार बिल्डरने तिन्ही खरेदीदारांना २०१८पर्यंत फ्लॅटचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्ण झाला नाही. खरेदीदारांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेटही मिळाले नाही. राजेश पांडे यांनी १९ जानेवारी २०१५ रोजी फ्लॅट क्रमांक सी-१०१साठी १९.८४ लाख रुपये भरले होते.

बिल्डरकडे एकूण ५६.२५ लाख रुपये जमा केले होते

मोतीराम भगवान जीभकाटे यांनी २० मे २०१५ रोजी फ्लॅट क्रमांक बी-१०४साठी १९.६६ लाख रुपये, तर दीपा विजयकुमार लालवानी यांनी ८ डिसेंबर २०१६ रोजी फ्लॅट क्रमांक बी-२०४साठी १६.७५ लाख रुपये भरले होते. तिघांनी मिळून बिल्डरकडे एकूण ५६.२५ लाख रुपये जमा केले होते. याशिवाय स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणीचा खर्चही त्यांनी केला होता.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : काळजाचा तुकडा वाचवताना आई-बापही दरीत कोसळले; 3 तास डोंगरावर थरार, एकाच कुटुंबाचा करुण अंत

अतिरिक्त मोबदला महारेराने अमान्य केला.

बिल्डरकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने खरेदीदारांनी महारेराकडे दाद मागितली. सुनावणीदरम्यान महारेराने अष्टविनायक प्लॅनर्स अँड डेव्हलपर्सला दोषी ठरवले. महाराष्ट्र रेरा नियम, २०१७च्या नियम १८नुसार जमा रकमेवर पूर्ण परतफेड होईपर्यंत व्याजलागू राहील, असे आदेशात नमूद आहे. मात्र, खरेदीदारांनी मागितलेला अतिरिक्त मोबदला महारेराने अमान्य केला.

Maharashtra TimesTamhini Ghat : ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार होणार, दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्तता होणार

हा प्रकल्प प्रगती अहवाल न भरणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत

जामठा-वर्धा रोडवरील अष्टविनायकचा पाम सिटी प्रकल्पअद्याप पूर्ण झालेला नाही. महारेराच्या माहितीनुसार, या प्रकल्पाला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेले नाही. प्रकल्पाची नवी पूर्णता तारीख ३१ डिसेंबर २०२८ निश्चित करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकल्प महारेराच्या प्रगती अहवाल न भरणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत नोंदवला गेला आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा