Headlines

ठरलं तर मग! स्टार प्रवाहच्या ‘मी कात टाकली’ मालिकेत अभिनेत्री सानिका मोजार दिसणार नागिणीच्या रुपात


Star Pravah New Serial Actress :‘मी कात टाकली’ या आगामी मालिकेची सध्या चर्चा सुरू आहे. या मालिकेत नागिण साकारणार?याबद्दल उत्सुकता होती. अखेर त्या अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.

Star Pravah Actress sanika mojar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नागपंचमीचं औचित्य साधून स्टार प्रवाह वाहिनीनंही बहुप्रतिक्षित ‘ मी कात टाकली ’ मालिकेचा टिझर लॉन्च केला. पहिल्या टिझरनंतर मालिकेत नागिणीच्या रुपात कोणती अभिनेत्री दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चाही रंगली. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे. मी कात टाकली मालिकेतून अभिनेत्री सानिका मोजार नागिणीच्या रुपात भेटीला येणार आहे. गूढ आणि रहस्यमय विषयांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. याच आवडीचा विचार करून स्टार प्रवाह पहिल्यांदाच नागतत्त्वावर आधारित हा अनोखा विषय घेऊन येत आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा विषय हाताळला जाणार असून रहस्य, थरार आणि भावनिक नात्यांची अनोखी गुंफण ‘मी कात टाकली’ मालिकेतून पाहायला मिळणार आहे. संतोष अयाचित यांच्या येळकोटी निर्मिती संस्थेने मालिकेची निर्मिती केली आहे.

Maharashtra Times‘लगेच लग्न करणार होते गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार’, घटस्फोटाच्या याचिकेसंदर्भात सुनीता आहुजाचा धक्कादायक दावा,राखी सावंतचा अजब सल्ला
मी कात टाकली या मालिकेत सानिका साकारत असलेली यामिनी अतिशय अभ्यासू, हुशार, उत्साही, जिद्दी आणि स्वतंत्र विचारांची आहे. यामिनीचं जग तिच्या आईभोवती विणलेलं आहे. मात्र तिच्या या साध्या आयुष्यामागे एक गूढ सत्य दडलेलं आहे. यामिनीला तिच्यामध्ये असलेल्या नागतत्त्वाची जाणीव नाही. मात्र जेव्हा तिला या सत्याची जाणीव होईल तेव्हा तिच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडतील? तिच्यासमोर कोणती गूढ रहस्यं उलगडतील? आणि या सगळ्याचा तिच्या जवळच्या माणसांवर काय परिणाम होईल? या प्रश्नांची उत्तरं उलगडणारी रंजक कथा म्हणजे ‘मी कात टाकली’ मालिका.

Maharashtra TimesAwarapan 2: अख्खा बॉलिवूड एक तरफ! इम्रान हाश्मीची वेगळीच क्रेझ, ‘आवारपन २’ने एका आठवड्यात केली तब्बल इतक्या कोटींची कमाई
या भूमिकेविषयी सांगताना सानिका मोजार म्हणाली, ‘मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच हा गूढ विषय हाताळला जातोय. जेव्हा या विषयावरील मालिका मराठीत येईल तेव्हा नागिणीची भूमिका मला साकारायला मिळावी अशी खूप इच्छा होती. मी कात टाकलीच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होतेय. यामिनी ही फक्त नागिणीची भूमिका नाही, तर एका मुलीचा स्वत्वाचा शोध घेणारा प्रवास आहे. तिच्यातील निरागसता आणि तिच्यात दडलेलं नागतत्त्व हे दोन्ही पैलू साकारताना खूप काही शिकायला मिळत आहे. ही भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रेक्षक यामिनीला आणि तिच्या या अनोख्या प्रवासाला नक्कीच भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.’ तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका मी कात टाकली २८ सप्टेंबरपासून फक्त स्टार प्रवाहवर.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा