Headlines

छत्रपती संभाजीनगर हादरले:आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; धक्का बसलेल्या आईनेही मारली उडी




छत्रपती संभाजीनगर शहरात आज एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर, आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनेही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांच्या अशा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण संभाजीनगर जिल्हा हादरला आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर हा थरार घडला. देवळाई-सातारा परिसरातील राहणाऱ्या १८ वर्षीय तरुण आत्महत्या करण्यासाठी या डोंगरावर गेला होता. याबाबतची माहिती मिळताच त्याचे आई, वडिलांसह परिसरातील काही नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. वाचवण्याचा प्रयत्न आणि काळजाचा ठोका चुकवणारा क्षण डोंगराच्या अगदी कड्यावर उभा असलेला कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे वडील आणि उपस्थित नागरिक त्याची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. ‘उडी मारू नकोस’, असे त्याला विनवत होते. याच दरम्यान, वडिलांनी पुढे झेप घेत मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्याच क्षणी मुलाने खाली उडी घेतली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघेही शेकडो फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आईनेही संपवले जीवन आपल्या डोळ्यांसमोर अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे पाहून कुणालची आई संगीता चांदवडे यांना तीव्र मानसिक धक्का बसला. नवरा आणि मुलाच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने त्यांनीही क्षणार्धात त्याच डोंगरावरून दरीत उडी घेतली. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. उपस्थित लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर उशीर झाला होता. कारणांचा शोध सुरू या घटनेमुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कुणालने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले आणि आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे सातारा-देवळाई परिसरासह संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा.. आयटी पार्कमागील रस्त्यावर दुचाकीलाकारची धडक; 2 भाऊ जागीच मृत्युमुखी:कारने विरुद्ध दिशेने येऊन उडवले; कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच शहरात आलेल्या २ सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. चिकलठाणा एमआयडीसीमधील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात निखिल अंकुश आरके (२३) आणि कपिल अंकुश आरके (१८) (दोघे रा. बंजारा कॉलनी, नूर कॉलनीजवळ, ता. सिल्लोड) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत