Headlines

Unclaimed Deposit Claim Process ; देशात ₹98,073 कोटी बेवारस डिपोजिट! तुमच्या कुटुंबातील कुणाचे पैसे पडून तर नाहीत ना? मिनिटांत शोधा Unclaimed Deposits


भारतात सामान्य वर्गामध्ये गुंतवणुकीचा प्रमुख प्रकार म्हणून फिक्स्ड डिपोजिट कडे पाहिले जाते. या गुंतवणुकीवर मिळणारे निश्चित व्याज आणि सुरक्षितता यामुळे देशातील मोठी लोकसंख्या फिक्स्ड डिपोजिट प्रकारात पैशांची ठेवण करते. अनेकदा खातेदाराच्या मृत्यूमुळे किंवा खात्याकडे लक्ष न दिल्यामुळे खाते Unclaimed Deposit म्हणून जमा होते. विशेष म्हणजे ज्या एफडीची मॅच्युरिटी झाली आहे पण अद्याप कुणी पैसे जमा केले नाहीयेत अशा एफडीला Unclaimed Deposits म्हणतात.

एफडी मॅच्युर झाल्याच्या दहा वर्षांनी एफडी Unclaimed होऊ शकते. समजा, तुम्ही 2010 साली एफडी घेतली. 2015 ला तुमची एफडी मॅच्युर झाली परंतु पुढील दहा वर्षांपर्यंत तिला क्लेम करण्यात आले नाही तर टी एफडी Unclaimed Deposit म्हणून जमा होते. विशेष गोष्ट म्हणजे एफडी बेवारस पडली असली तरीही बँकेकडून त्यावर व्याज जमा होत असतो आणि बँकेचे सर्विस चार्ज आकारणेही सुरूच असते.

एफडीला कुणी क्लेम केले नाही तर दहा वर्षानंतर ती डीईए फंडमध्ये जमा होते. हे फंड डिपोजिटरच्या शिक्षणासाठी तसेच कल्याणासाठी उभारलेले फंड आहे. पण एफडी खाते असणाऱ्या खातेधारकाने घाबरून जाण्याचे कारण नाही. जरी एफडी डीईए फंडमध्ये जमा झाली असली तरी त्यावर खातेधारकाचा क्लेम कायम राहतो. एफडी डीईए फंडात जमा झाली म्हणजे त्यावर हक्क असणाऱ्या खातेधारकाचे पैसे गेले असे मुळीच नसते, ते पैसे मिळवता येतात.

अगदी खातेधारकाने नेमलेला नॉमिनीही डीईए फंडात जमा झालेल्या एफडीला मिळवण्यात सक्षम आहे. जर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या Unclaimed Deposit विषयी जाणून घ्यायचे आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या UDGAM या पोर्टलला भेट द्या. आधी रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर लॉगिन करून ‘सर्च फॉर Unclaimed Deposit’ या पर्यायावर क्लिक करा. खातेधारकाचे नाव टाकून Unclaimed Deposit खात्याविषयी संपूर्ण रेकॉर्डस मिळवा. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे रेकॉर्डस सापडले तर संबंधित बँकेला भेट देऊन एफडी क्लेम करा.

एफडी क्लेम करण्याचे पर्याय

जर खातेधारक जिवंत असेल तर खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी खातेधारकाची केवायसी करा. जर खातेधारक मृत असेल तर त्याने निवडलेला अधिकृत नॉमिनी एफडी मिळवण्यात पात्र असतो. नॉमिनीकडे मूळ खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच नॉमिनीला केवायसी करावी लागते. जर संबंधित एफडीला नॉमिनी नसेल तर खातेधारकाचा कायदेशीर वारस या एफडीला मिळवू शकतो. त्यासाठी बँक क्लेम फॉर्म, खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, Indemnity Bond तसेच बहुतेक वेळा Affidavit मागते. तसेच वारस असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनेकदा Legal Heir Certificate ही मागण्यात येते.

Maharashtra Timesडॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?जानेवारी 2026 मध्ये देशात एकूण 98,073 कोटी रुपये Unclaimed Deposit आहेत तर जून 2025 मध्ये ही रक्कम 90,545 कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली होती.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत