Headlines

26 year old youth ends life in pune due to womens harassment accused arrested after two weeks; महिलेकडून पैशांसाठी छळ अन् धमक्या; पुण्यात २६ वर्षीय युवकाने मृत्यूला कवटाळलं


श्रीकृष्ण पांचाळ, पुणे: पुण्यातील भोसरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मानसिक छळाला आणि सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका २६ वर्षीय दिव्यांग युवकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पैशांसाठी त्रास देत असल्याचं त्याने सांगितल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी सरोज माने या महिलेला अटक केली आहे. ही घटना २७ जुलै रोजी भोसरीतील डेस्टिनेशन क्षितिज सोसायटीमध्ये घडली. मृत युवकाचं नाव २६ वर्षीय विनोद चौधरी असं आहे, तर आरोपी महिलेचं नाव सरोज माने आहे.

पोलिसांच्या तक्रारीनुसार, सरोज माने हिने विनोदवर सोन्याचे झुमके चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. धमकीला घाबरून विनोदने कर्ज काढून संबंधित महिलेला एक लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही विनोदकडे आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्याला धमक्या दिल्याचा आरोप आहे.

सततची पैशांची मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून विनोदने सोसायटीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विनोदने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पैशांसाठी त्रास देत असल्याचं त्याने सांगितल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, घटना २७ जुलै रोजी घडली असली तरी या प्रकरणी ८ ऑगस्ट रोजी भोसरी पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सरोज माने हिला अटक केली.

या प्रकरणात सरोज माने व्यतिरिक्त आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच पैशांच्या मागणीमागे नेमकं कारण काय होतं, याचा तपास भोसरी पोलिसांकडून सुरू आहे. एक लाख रुपये दिल्यानंतरही आणखी ५५ हजार रुपयांची मागणी का करण्यात आली? विनोदला नेमक्या कोणत्या धमक्या दिल्या जात होत्या? आणि आत्महत्येपूर्वी त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे? या सर्व बाबींचा तपास आता भोसरी पोलिस करत आहेत.

दरम्यान, पैशांची मागणी, मानसिक छळ आणि त्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याच्या या प्रकरणामुळे भोसरीत खळबळ उडाली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत