Zee 5 : ‘झी 5’ नं नव्या प्रोजेक्टची घोषणा केली असून लवकरच ओटीटीवर नव्या वेब सीरिज, सिनेमे, AI शो तसेच कॉमेडी कार्याक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

प्रेक्षकांसाठी Zee 5 ची पर्वणी
आगामी सीरिजमध्ये ‘हे काय नवीन?’च्या दुसऱ्या सीझनचा समावेश आहे. बहावा एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या सीरिजमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र दिसणार आहेत. सिनेमास्टर्स प्रॉडक्शनच्या ‘देवखेळ’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या भूमिका आहेत. नवीन ओरिजिनल्समध्ये ‘कोण यशवंत पानसरे?’ आणि ‘112’ या सीरिजचा समावेश आहे. ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव, शर्वरी जमेनीस, पुष्कर श्रोत्री आणि शिवानी रांगोळे यांच्या भूमिका आहेत. कोक्लिको पिक्चर्सच्या ‘112’ची निर्मिती निखिल महाजन यांनी केली असून, जीविषा काळे आणि रोहित सातपुते यांनी दिग्दर्शन केलं आहे.चित्रपट विभागात रिलीजनंतर डिजिटल प्रीमियर होणाऱ्या चित्रपटांमध्ये झी स्टुडिओजच्या ‘तुंबाडची मंजुळा’चा समावेश आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि ओम भुतकर यांच्या भूमिका आहेत. ‘भूतम् भयम्’मध्ये नील सालेकर, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, सौरभ घाडगे आणि करण सोनावणे यांच्या भूमिका आहेत. याशिवाय मंगेश पवार कंपनी निर्मित ‘अडकित्ता’ या ओरिजिनल चित्रपटाचा प्रीमियरही प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहेत.
Vijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ
कॉमेडी कंटेंटमध्ये ‘हसवा हसवी – द मराठी स्टँड-अप शो’चा समावेश करण्यात आला आहे. अनिश गोरेगांवकर प्रॉडक्शन्सच्या या शोमध्ये अनिश गोरेगांवकर, फातिमा आयेशा, संकेत जोशी, साहिल होराणे आणि साहिल शेख सहभागी आहेत. प्लॅटफॉर्मच्या इतर कंटेंटमध्ये ‘गरुड’, ‘विक्रम वेताळ’, ‘शिव सती’, ‘चंद्रकांता’, ‘तिरुपती बालाजी’, ‘नर्मदा’, ‘राम अंजनेय युद्ध’ आणि ‘बर्बरिक’ यांसारख्या एआय-आधारित शीर्षकांचा समावेश आहे. लाइव्ह स्पोर्ट्समध्ये फिफा, बुंडेसलिगा, सीरी ए आणि आयएलटी20 या स्पर्धा उपलब्ध असतील.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी Zee 5 च्या बिझनेस हेड व्ही. आर. हेमा म्हणाल्या, ‘मराठी प्रेक्षकांसाठी स्वतंत्र स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची गरज असल्याच्या विचारातून मराठी Zee 5 ची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात मिळालेल्या प्रतिसादानंतर आम्ही नवीन ओरिजिनल्स, लोकप्रिय सीरिजचे पुढील सीझन, चित्रपट आणि इतर प्रकारचा कंटेंट सादर करत आहोत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील निर्माते आणि कलाकारांसोबत काम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ नवीन सीरिज आणि चित्रपटांसोबतच कॉमेडी, एआय-आधारित कंटेंट आणि लाइव्ह स्पोर्ट्सचा समावेश करून प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचे स्वरूप विस्तारित करण्यात येत आहे.
Zee 5 बद्दल
Zee 5 हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे डिजिटल मनोरंजन व्यासपीठ आहे. प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि मराठी या भाषांमध्ये चित्रपट, सीरिज, लाइव्ह स्पोर्ट्स, एआय-आधारित कथा, ॲनिमेशन आणि मुलांसाठीचा कंटेंट उपलब्ध आहे. Zee 5ची सेवा 190हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असून, दक्षिण आशियाई कंटेंट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. झी एंटरटेनमेंटची फिफासोबत २०३४ पर्यंत भागीदारी आहे. या भागीदारीअंतर्गत फिफा वर्ल्ड कप २०२६ आणि २०३० सह फिफाच्या विविध फुटबॉल स्पर्धांचं प्रसारण भारतात Zee 5वर केलं जाणार आहे.

