Headlines

Pune court orders husband to pay 9000 alimony how liquor purchases influenced the case; पुण्यातील पतीने बायकोला पोटगी देण्यास नकार दिला, पण दारुने घोळ केला; कोर्टाने बँक स्टेटमेंट पाहताच केस फिरली


म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘मद्य खरेदी करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीकडे लक्षणीय उत्पन्न असते,’ असे निरीक्षण नोंदवून पुणे न्यायालयाने पतीला पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा नऊ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. पतीने स्वतःचे उत्पन्न दरमहा केवळ दहा ते पंधरा हजार रुपये असल्याचा दावा केला. मात्र, न्यायालयाने पतीच्या बँक खात्यातील व्यवहार, मद्यखरेदीच्या खर्चाच्या नोंदी लक्षात घेऊन त्याच्याकडे पत्नी-मुलांचा सांभाळ करण्यासाठी संभाव्य उत्पन्न पंधरा ते अठरा हजार रुपये असल्याचे ग्राह्य धरले.

‘दोन अल्पवयीन मुलांची जबाबदारी आईकडे असून, पतीकडून मदत नसताना त्यांचा सांभाळ करणे सोपे नाही. सध्याच्या काळात एखादा अकुशल कामगारही दररोज चारशे ते पाचशे रुपये कमावू शकतो. या पार्श्वभूमीवर पतीचे संभाव्य मासिक उत्पन्न १५ ते १८ हजार रुपये धरता येईल,’ असे नमूद करून, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश अशोक सुपेकर यांनी हा आदेश दिला.

कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात वैवाहिक सहजीवनाच्या पुनर्स्थापनेसाठीपुण्यातील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या अंतर्गत पत्नीने स्वतःसह दोन अल्पवयीन मुलांच्या दैनंदिन गरजा, शिक्षण आणि उपजीविकेसाठी दरमहा ५० हजार रुपये अंतरिम पोटगी मिळावी, असा अर्ज केला होता. ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी पत्नीची बाजू मांडली.

या दाम्पत्याचा २०१३मध्ये विवाह झाला. कौटुंबिक वादातून शारीरिक-मानसिक छळाचा आरोप करून, पत्नी दोन अल्पवयीन मुलांसह स्वतंत्र राहते. आपण घरकाम करून महिना जेमतेम चार हजार रुपये कमावत असून, या तुटपुंज्या उत्पन्नात वाढती महागाई, राहणीमान, शिक्षण, आरोग्यासह दैनंदिन खर्च भागविणे शक्य नसल्याचा दावा पत्नीने केला. पतीने या अर्जाला विरोध करताना स्वतःचे मासिक उत्पन्न केवळ दहा ते पंधरा हजार रुपये असल्याचा दावा केला. पत्नीचा ब्यूटी पार्लरचा व्यवसाय असून, तिच्या आईच्या नावे असलेल्या तीन सदनिकांच्या भाडेरकमेतून तिला मोठे उत्पन्न मिळते, असा युक्तिवादही कोर्टात पतीच्या वकिलांनी केला. मात्र, पतीने पत्नीच्या कथित उत्पन्नाबाबत ठोस पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत.

दरम्यान, हिंदू विवाह कायद्याच्या कलम २४ चा उद्देश स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या पक्षकाराला खटल्यादरम्यान आर्थिक मदत मिळावी, असा आहे. या तरतुदीचा उद्देश कल्याणकारी स्वरूपाचा असून, महिलांना आणि मुलांना अंतरिम आधार देणे हा त्यामागील हेतू आहे. मुलांची जबाबदारी सध्या पत्नीवर आहे. त्यामुळे पत्नी आणि मुलांच्या किमान गरजा भागविण्यासाठी पतीकडून काही रक्कम देणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत