Headlines

SEBI F&O Closing Auction Session; 3.68 कोटींचा घपला, Share Market मध्येही एन्ट्री बॅन; CAS फेरफार प्रकरणी दोन संस्थांवर सेबीची ॲक्शन


SEBI Closing Auction Session Probe News: भारतीय शेअर बाजारात 3 ऑगस्टपासून अंमलात आलेले क्लोजिंग ऑक्शन सेशन -CAS – सतत छाननीखाली आहे. त्याच्या या नव्या कार्यप्रणालीबद्दल काहींनी प्रश्न उपस्थित केले असताना सेबीने CAS मधील फेरफार प्रकरणी 2 कंपन्यांवर बाजारातून बंदीची कारवाई केली आणि 3.68 कोटी रुपये परत करण्याचे निर्देशही जारी केले आहेत.

SEBI Action against CAS Manipulation
CAS फेरफार प्रकरणी दोन संस्थांवर सेबीची ॲक्शन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Share Market News: 3 ऑगस्टपासून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. याअंतर्गत क्लोजिंग ऑक्शन सत्र लागू केले गेले असून या नव्या कार्यप्रणालीनुसार आता शेअर बाजारातील ट्रेडिंग दिवसाच्या शेवटी शेअर्सची अंतिम किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया सुधारणे आणि सुव्यवस्थित केली जाईल. पण, ही प्रणाली लागू झाल्यापासून काही लोकांनी कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सेबीकडून अलीकडेच CAS मधील फेरफार प्रकरणी दोन कंपन्यांविरुद्ध कारवाई केली आहे.

CAS फेरफारवरून सेबीची कारवाई

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने सेन्सेक्स क्लोजिंग ऑक्शन सेशनदरम्यान कथित हेराफेरीच्या व्यवहारांप्रकरणी कॉपथॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रतिभूती बाजारातून बंदी घातली असून दोघांना एकत्रित 3.68 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी कॉम्पटोल मॉरिशस इन्व्हेस्टमेंटनी कथित 2.96 कोटींची कमाई केली तर, मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगनी 71.64 लाख रुपये कमावले.

Maharashtra TimesGlobal Bond Sell-off: जागतिक बाजारात टेन्शनचा माहौल; बाँड बाजारातील मृगजळ पाहून भलेभले चक्रावून गेले, भारतावरही होणार परिणामहे प्रकरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वरील सेन्सेक्स करारांच्या सेटलमेंटच्या दिवशी, म्हणजे 13 ऑगस्ट रोजी, CAS दरम्यान केलेल्या कथित हेराफेरीच्या व्यवहारांशी संबंधित आहे. नियामकाने कथित हेराफेरीच्या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांत ही कारवाई केली. ऑक्शन सत्रात ट्रेडिंग करणाऱ्या एखाद्या संस्थेविरुद्ध सेबीने औपचारिक कार्यवाही सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याशिवाय, सेबीने पुढील आदेश जारी करेपर्यंत दोघांना इक्विटी सेगमेंटमधील CAS मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होण्यास, तसेच CAS दरम्यान ऑर्डर्स देण्यास, बदल करण्यास किंवा रद्द करण्यास बंदी घातली आहे. मात्र, मानसी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगच्या बाबतीत ही बंदी केवळ प्रोप्रायटरी ट्रेडिंग खात्याला लागू होईल.

13 ऑगस्ट रोजी सेबीच्या आदेशानुसार सेन्सेक्सच्या विकली एक्सपायरी दिवशी नियामक संस्थेने इंडिकेटिव्ह इक्विलिब्रियम प्राईसमध्ये 3 spikes असल्याचे निदर्शनास आणले. यामध्ये सेन्सेक्सने दोन सेकंदांत 362 अंकांची, 12 सेकंदांत 132.67 अंक आणि त्यानंतर 28 सेकंदांत आणखी 405.08 अंकांची उसळी घेतली.

Maharashtra Timesपालकांच्या अडचणीतून तयार झाली व्यवसायाची संधी! आईच्या काळजीने उभा राहिला हजारो कोटींचा व्यवसाय, कोण आहेत रितू नारायण?

CAS कार्यप्रणालीवर काय म्हणाले सेबी अध्यक्ष

दुसरीकडे, CAS बद्दल बाजारात प्रशचिन्ह उपस्थित केले जात असताना देशांतर्गत मार्केटमध्ये नुकतेच लागू केलेले क्लोजिंग ऑक्शन सेशनचे नियम सध्या तरी मागे घेतला जाणार नाही, असे बाजार नियामक सेबीने स्पष्ट केले आहे. मात्र, सेबी अध्यक्ष म्हणाले की, बाजारातील सहभागींकडून मिळालेल्या समस्या आणि सूचनांच्या आधारे या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन केले जात असून गरज पडल्यास काही बदल केले जाऊ शकतात.

3 ऑगस्ट रोजी भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये CAS प्रणाली लागू झाली. या प्रणालीअंतर्गत खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्स दिवसाच्या शेवटी एका विशिष्ट विंडोमध्ये एकत्रित केल्या जातात आणि अशा equilibrium price ची जुळवणी केली जाते, ज्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेअर्सचा व्यवहार होऊ शकतो. किमती निश्चित करण्याची प्रक्रिया किंवा price discovery सुधारणे आणि देशांतर्गत बाजाराला इतर प्रमुख बाजारांमधील कार्यपद्धतींच्या अधिक जवळ आणण्याचा या यंत्रणेचा उद्देश आहे.