Suresh Oberoi : सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. सुरेश ओबेरॉय यांनी सांगितलं की, राजकारणात येण्याचा त्यांचा निर्णय हे त्यांचं स्वप्न नव्हतं. हैदराबाद कॉलेजमधील त्यांच्या एका मित्रानं त्यांना भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला होता.
सुरेश ओबेरॉय म्हणाले की, ‘माझा कॉलेजमध्ये एक मित्र होता. एके दिवशी तो माझ्या घरी आला आणि त्यानं मला भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितला. म्हणून मी त्याच्यासोबत गेलो.’ सुरेश ओबेरॉय २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी पक्षासाठी प्रचार केला आणि पक्षाच्या सांस्कृतिक शाखेत सामील झाले. पक्षप्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. सुरेश म्हणाले की, एल.के. अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना हारही घातला होता. पण याच काळात त्यांच्या गुरूंनी त्यांना चांगलंच सुनावलं. सुरेश यांनी सांगितलं की, त्यांचे गुरू म्हणाले, ‘सावध रहा, या लोकांशी संपर्कही ठेवू नकोस.’ सुरेश म्हणाले की, ‘माझे गुरू यापूर्वी कोणालाही असं ओरडले नव्हते.’
Zee Marathi Actress : जिकडे राहायची त्यांनी पनवती म्हणून हिणवलं, स्वाभिमानानं घर सोडलं, तीन दिवस दादर स्टेशनवर राहिली; मराठी अभिनेत्रीनं सांगितला संघर्षकाळ सुरेश म्हणाले, ‘मी राजकारणी नेत्यांच्या संपर्कात राहिलो, पण नंतर मला मनापासून आनंद वाटत नव्हता.’ सुरेश पुढे म्हणाले की, त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल त्यांना आदर होता. पण राजकारणातील इतर अनेक लोकांचं वागणं त्यांना विचित्र वाटलं. त्यांना खोटेपणा जाणवत होता. पुढे, चित्रपट आणि राजकारण यांची तुलना करताना सुरेश म्हणाले की, ‘चित्रपटात एक प्रोजेक्ट संपतो आणि तुम्ही पुढे जाता. पण राजकारणात तसं नसतं. तिथे सतत लोकांशी संपर्क ठेवावा लागतो, एकत्र काम करवं लागतं आणि व्यवस्थेचा एक भाग बनावं लागतं. मी त्याचा भाग बनू शकलो नाही.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
सुरेश ओबेरॉय यांचं राजकीय करिअर
सुरेश ओबेरॉय यांचा भाजपसोबतचा राजकीय प्रवास फेब्रुवारी २००४ मध्ये सुरू झाला. त्या काळात नवज्योत सिंग सिद्धू आणि गजेंद्र चौहान यांच्यासह अनेक चित्रपट आणि कलाकारांनी पक्ष प्रवेश केलेला. १७ फेब्रुवारी २००४ रोजी सुरेश औपचारिकपणे सदस्य झाले. त्यानंतर, त्यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यांनी मेघालयासह अनेक ठिकाणी भाजपसाठी प्रचार केला आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला उघडपणे पाठिंबा दिला.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा