Headlines

IND vs SL Turning Point : भारत-श्रीलंका कसोटी सामन्यामध्ये 1 ओव्हर ठरली टर्निंग पॉइंट संपूर्ण मॅच फिरली, शुभमनचा एक्का पडला लंकेवर भारी, जाणून घ्या – ind vs sl 1st tets match turning point manav suthar take three wicket in one over


IND vs SL Turning Point Video : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला कसोटी सामना पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवसापर्यंत रंगला होता. या सामन्यामध्ये फक्त एक ओव्हर अशी होती ज्यामुळे सामना निकाली निघाला, नेमकी कोणती? जाणून घ्या.

IND vs SL Turning Point
IND vs SL Turning Point(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ६००व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यामध्ये श्रीलंका संघावर १६५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीने हा विजय मिळवणं सोपं झालं. भारतीय संघाला फक्त श्रीलंकेचे नाहीतर निसर्गाचेही आव्हा होते. हार मानतील ते भारतीय खेळाडू कसले. पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या कसोटी सामन्याचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट एक ओव्हर ठरली. कारण या एकाच ओव्हरमध्ये भारताने तीन विकेट घेत सामन्यावर पकड आणखी मजबूत केली. जर त्या ओव्हरमध्ये तीन विकेट नसत्या आल्या तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा असता, नेमकी ही ओव्हर कोणी टाकलेले आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट कशी ते जाणून घ्या.

भारत-श्रीलंका सामन्याचा टर्निंग पॉइंट

श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी ३७२ धावांचे लक्ष्य भारताने दिले होते. मात्र चौथ्या दिवशी श्रीलंका संघाने आपल्या चार विकेट गमावल्या होत्या, पाचव्या दिवशीसुद्धा सकाळ सकाळी दोन विकेट गेल्यावर मैदानात असलेले सोनाल दिनुशा आणि केशरा नुवांता यांनी ४३ धावांची भागीदारी केली होती, त्यामुळे भारतापासून विजय लांबला जातो की काय असे वाटू लागले होते. कारण पावसामुळे सामना रद्द झाला असता तर हातातोंडाशी आलेला घास गेल्यासारखं झालं असतं. त्यावेळी शुभमन गिल याने आपला हुकमी एक्का बाहेर काढला.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : ऋषभ बेजबाबदार खेळतो म्हणत कितीही नावे ठेवा पण पंत ठरलाय भारताचा कसोटी नंबर वन प्लेयर; कॅप्टन गिल, रोहित, विराट सगळेच पिछाडीवर
७६ वी ओव्हर मानव सुतारला दिली. शुभमनचा हा निर्णय सर्वात महत्त्वाचा आणि सामना पालटवणारा ठरला. कारण या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर मानव सुतार याने सोनल दिनुशा (८४ धावा), दुसऱ्या चेंडूवर प्रभाथ जयसूर्या (० धावा) आणि सहाव्या चेंडूवर लाहिरू कुमारा (० धावा) या तिघांना आऊट करत संपूर्ण सामना फिरवला. या तीन विकेट घेतल्याने सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला आणि श्रीलंका पूर्णपणे बॅकफूटला फेकली गेली होती. यानंतर पुन्हा ७८ वी ओव्हर मानवकडेच दिल्यानंतर त्याने शेवटचीहीसुद्धा विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : भारताचा 600 व्या ऐतिहासिक सामन्यात दणदणीत विजय; मानव सुतारच्या 10 विकेट, सामनावीर कोण?दरम्यान, या सामन्यामध्ये मानव सुतार याने दहा विकेट नावावर केल्या. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावामध्ये ६ विकेट नावावर करत भारताला हा सामना जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण सामनावीर म्हणून सुतारला नाहीतर देवदत्त पडिक्क याची निवड केली गेली. देवदत्तची कामगिरी पाहिली तर त्याने या सामन्यामध्ये २११ धावा केलेल्या. पहिल्या डावामध्ये १६७ धावा आणि दुसऱ्या डावामध्ये ४४ धावा त्याने केल्या होत्या. मात्र अनेक चाहत्यांनी मानवला सामनावीर पुरस्कार न दिल्याने नाराजी व्यक्त केली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा