Headlines

Sarpanch Mangesh Sable | तडीपारीची नोटीस, १०० वकिलांची फौज उतरवणार, सरपंच साबळेंचा थेट इशारा – sarpanch mangesh sable on externment notice



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sarpanchmangeshsable #mangeshsableonnotice #chhatrapatisambhajinagar #maneshsablenewsआठ गंभीर गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटीसला उत्तर देण्यास सरपंच मंगेश साबळे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. “माझ्यावरील सर्व आरोप आणि गुन्हे पूर्णपणे खोटे आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी व्यवस्थेशी भांडल्यामुळेच राजकीय दबावातून ही कारवाई केली जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.​या खोट्या नोटीसला पोलिसांकडे उत्तर न देता कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या षड्यंत्राविरोधात लढण्यासाठी १०० पेक्षा अधिक वकिलांची कायदेशीर टीम तयार करण्यात आली असून, त्याद्वारे पोलीस प्रशासनाला कोर्टात जाब विचारला जाईल. तसेच या अन्यायाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे धाव घेऊन प्रशासनाच्या या भूमिकेला आव्हान दिले जाईल, असा थेट इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत