महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Shubman Gill News: भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यामध्ये १६५ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार शुभमन गिल याने दोघांची नावे घेत त्यांना विजयाचे श्रेय दिले आहे. कोण आहेत ते दोघे जाणून घ्या.

शुभमन गिल काय म्हणाला?
आमच्यासाठी हा विजय खूप विशेष असून तो मिळवल्याने समाधान वाटत आहे. पण हवामानामुळे सामना होईल की नाही याची खात्री अजिबात नव्हती.पण खेळाडूंनी परिस्थितीला प्रतिसाद दिला. दुसऱ्या डावात फलंदाजी गडगडली कारण आमचा प्रयत्न होता की ४०० पर्यंत धावा करणे. तिसऱ्या दिवशी खेळपट्टी सोपी राहिली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे चौथ्या आणि पाचव्या दिवशी किती बॉलिंग करायला मिळेल याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळे आम्ही तिसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला होता पण त्यामुळे सुरूवातीच्या झटपट विकेट गेल्याचं शुभमन गिलने सांगितलं. यावेळी बोलताना शुभमन गिल याने दोन खेळाडूंचे मनभरून कौतुक केले.
IND vs SL 1st Test : ऋषभ बेजबाबदार खेळतो म्हणत कितीही नावे ठेवा पण पंत ठरलाय भारताचा कसोटी नंबर वन प्लेयर; कॅप्टन गिल, रोहित, विराट सगळेच पिछाडीवरमानव एकदम दमदार गोलंदाजी करतोय, भारत आणि अफगाणिस्तानविरूद्धमध्ये झालेल्या सामन्यात पदार्पणावेळीच त्याने शानदार गोलंदाजी केली होती. तो प्रतिभावान आणि आश्वासक खेळाडू असून तो अधिक काळ भारतासाठी खेळू शकतो. देवदत्तने फलंदाजी करत असताना त्याने शतक केलेच पण त्यासोबत त्याने डाव पूढे नेला आणि मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे सामन्यात चुरस संपली आणि आम्ही चांगल्या स्थितीत परतलो. दुसऱ्या डावामध्येही त्याने शानदार फलंदाजी केली, फिरकी गोलंदाजांवर त्याने आपले वर्चस्व गाजवल्याचं म्हणत गिलने दोघांचे कौतुक केले.
IND vs SL 1st Test : भारताचा 600 व्या ऐतिहासिक सामन्यात दणदणीत विजय; मानव सुतारच्या 10 विकेट, सामनावीर कोण?दरम्यान, या सामन्यामध्ये मानव सुतार याने दहा विकेट घेतल्या. पहिल्या डावात आणि ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. मानव याने दोन कसोटी सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. सामनावीर ठरलेल्या देवदत्त पडिक्कल याने १६७ आणि ४४ धावा केल्या. भारताच्या विजयात दोघांच्या कामगिरीची महत्त्वाची भूमिका राहिली.
