Headlines

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम माझ्यासाठी प्रयोगशाळा, नम्रतासोबत काम करण्याचा अनुभव ‘सुपर डुपर’, अभिनेत्री प्रतीक्षा कोते काय म्हणाली?


Pratiksha Kote on Maharashtrachi Hasya Jatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक युवा कलाकार हे आता वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसतायत. यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रतीक्षा कोते.

Pratiksha Kote
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अदिती पवार,जे. पी लॉ कॉलेज

एनएसडीच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणातून अभिनयाची मुशाफिरी सुरू केलेली अभिनेत्री प्रतीक्षा कोते रंगभूमीपासून चित्रपट आणि आता ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ पर्यंतचा प्रवास अनुभवतेय. ‘साबर बोंडं’, ‘सुपर डुपर’ या सिनेमांमधील भूमिका आणि रंगभूमीवरील कामानंतर आता विविध व्यक्तिरेखांमधून स्वतःला आजमावताना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी अभिनयाची प्रयोगशाळा आहे’, असं ती सांगते.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (एनएसडी) शिक्षण

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (एनएसडी) शिक्षण घेतल्यानंतर प्रतीक्षाला वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याचा अनुभव मिळाला. विविध व्यक्तिरेखांवर बारकाईनं काम करण्याची संधी क्वचितच मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नं ही संधी पुन्हा दिली आहे, असं ती आवर्जून नमूद करते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये प्रत्येक वेळी नवीन व्यक्तिरेखा, नवीन कलाकार आणि नवीन आव्हान मिळत असल्यानं या प्रवासाचा मी मनापासून आनंद घेतेय. कमी वेळात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायच्या आणि नवीन गोष्टी पटकन आत्मसात करायच्या, हे माझ्यासाठी वेगळं आहे. सहकलाकारांसह सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक रंजक होतेय’, असं ती म्हणाली.

“सुपर डुपर’च्या वेळी अनेक अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. सगळ्यांसोबत तयार झालेली केमिस्ट्री आणि बाँडिंगमुळे संपूर्ण अनुभव आणखी सुंदर झाला’, असं प्रतीक्षानं सांगितलं. चित्रपटाच्या तांत्रिक टीमकडूनही खूप काही शिकता आल्याचं ती म्हणाली.

Maharashtra TimesTharala Tar Mag New Promo : अर्जुनचा खेळ खल्लास? सायलीला मिळाला अशुभ संकेत, तुरुंगातून राम नाम सत्य है म्हणत प्रिया डाव साधणार

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

सध्या ती ‘मिथ्यासुर’ या हिंदी नाटकात रेवतीची भूमिका साकारतेय. अजीत सिंग पल्लावत यांच्या दिग्दर्शनाखाली आणि प्रणय पांडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचा अनुभव तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. विविध महोत्सवांसाठी या नाटकाची निवड झाली असून ‘मेटावार्ड्स’ विजेतं नाटक आहे.

नम्रतासोबतचा अनुभव खास

‘सुपर डुपर’ या सिनेमावेळी अभिनेत्री नम्रता संभेराव हिच्यासोबत काम करणं प्रतीक्षासाठी खास होतं. ‘उत्तम अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याची उत्सुकता होती. तिच्यासोबत अनेक प्रसंग असल्यामुळे तिचं काम जवळून पाहता आलं. प्रतिक्रिया कशी देते, व्यक्तिरेखेला कसं जगते, हे शिकण्यासारखं होतं’, असं तिनं सांगितलं.

Maharashtra TimesSunita Ahuja: गोविंदावर आरोप प्रत्यारोप, नात्याबद्दल उलट सुलट चर्चेदरम्यान सुनीता आहुजा वांद्र्यातल्या फॅमिली कोर्टात हजर, पापाराझीच्या प्रश्नावर दिलं भलतंच उत्तर
” व्यावसायिक नाटकात काम करण्याची माझी इच्छा आहे. आपल्या रंगभूमीवर ज्या पद्धतीनं काम होतं, तशाच दर्जाचं काम सर्वत्र व्हायला हवं, असं मी हिंदीतल्या सहकलाकारांनाही सांगत असते. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत, नवनवीन कलाकारांसोबत काम करत प्रत्येक अनुभवातून शिकायचं आहे.