Headlines

नेहा पेंडसेचा साडीतील क्लासी लुक मंगळसूत्राच्या खास डिझाईनने वेधलं लक्ष; मंगळागौरीला नक्की ट्राय करा असे सुंदर लुक – neha pendse’s classy look in saree mangalsutra design wins hearts


मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. नुकताच साडीतील तिचा रॉयल आणि क्लासी लुक चर्चेत आला असून, गळ्यातील हटके मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच देणारं हे मंगळसूत्र मंगळागौरीसाठी खास फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतं.

Neha Pendse Saree Look
फोटो सौजन्य :- team nehhapendse
मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि एलिगंट फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पारंपरिक साडीला मॉडर्न टच देत केलेली तिची स्टाइल नेहमीच लक्ष वेधून घेते. नुकताच तिचा साडीतील एक सुंदर आणि क्लासी लुक चर्चेत आला असून, या लुकमधील सर्वात खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे तिच्या गळ्यातील मंगळसूत्राची हटके डिझाईन. पारंपरिक दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्त्व आहे. मात्र, बदलत्या काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईनमध्येही अनेक नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. पारंपरिक सौंदर्य आणि मॉडर्न स्टाइल यांचा सुंदर मेळ साधणारी ही डिझाईन्स आजच्या महिलांना विशेष पसंत पडत आहेत. नेहा पेंडसेचा हा लुक त्याच आधुनिक दागिन्यांच्या ट्रेंडची झलक दाखवणारा आहे. (फोटो सौजन्य :- team nehhapendse)

मंगळसूत्र डिझाईन

मंगळसूत्र डिझाईन

लाल साडीतील नेहा पेंडसेचा रॉयल आणि एलिगंट अंदाज सध्या चांगलाच चर्चेत आहे. पारंपरिक साडीला मॉडर्न ज्वेलरीची सुंदर साथ देत नेहाने आपल्या लुकमध्ये खास ग्लॅमर आणलं आहे. मात्र, तिच्या या लुकमधील सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे मंगळसूत्राची हटके आणि स्टायलिश डिझाईन. पारंपरिकतेचा टच कायम ठेवत मॉडर्न पद्धतीने डिझाइन केलेलं हे मंगळसूत्र आजच्या महिलांसाठी नक्कीच फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतं.

मंगळसूत्राच्या डिझाईनने जिंकलं मन

मंगळसूत्राच्या डिझाईनने जिंकलं मन

मंगळसूत्र म्हटलं की, काळ्या मण्यांची पारंपरिक माळ आणि सोन्याचे पेंडंट हे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, आजच्या काळात मंगळसूत्रामध्ये मिनिमल आणि कंटेम्पररी डिझाईन्सना मोठी पसंती मिळत आहे. Aura Bling Jewelsच्या दागिन्यांसोबत दिसणारा नेहाचा हा लुक याच ट्रेंडला अधोरेखित करणारा आहे. मंगळसूत्रामध्ये पारंपरिक भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व कायम ठेवत त्याच्या डिझाईनला अधिक स्टायलिश स्वरूप देता येते, हे या लुकमधून पाहायला मिळते. आजच्या महिलांना असे दागिने अधिक आवडतात, जे फक्त पारंपरिक प्रसंगीच नव्हे तर ऑफिस, डिनर, छोट्या गेट-टुगेदरपासून सणासुदीपर्यंत विविध ठिकाणी सहज वापरता येतील. त्यामुळे मंगळसूत्राच्या बाबतीतही हलके, नाजूक आणि मॉडर्न डिझाईन हा एक महत्त्वाचा ट्रेंड बनला आहे.

मंगळागौरीसाठी असा लुक का खास?

मंगळागौरीसाठी असा लुक का खास?

श्रावणातील मंगळागौरीच्या सणाला पारंपरिक पोशाखाला विशेष महत्त्व असते. या दिवशी अनेक महिला आवर्जून साडी नेसतात, नटतात आणि पारंपरिक दागिने परिधान करतात. अशावेळी पूर्णपणे पारंपरिक किंवा खूप हेवी लुक करण्याऐवजी नेहाच्या लुकमधून क्लासी आणि एलिगंट स्टाइलची प्रेरणा घेता येईल. मंगळागौरीसाठी तुम्ही एखादी सुंदर सिल्क, पैठणी, कांजीवरम किंवा हलकी पारंपरिक साडी निवडू शकता.

पारंपरिक साडीला मॉडर्न ज्वेलरीची साथ

पारंपरिक साडीला मॉडर्न ज्वेलरीची साथ

साडीचा लुक अधिक सुंदर दिसण्यासाठी दागिन्यांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. साडी जर भरजरी किंवा डिझायनर असेल, तर त्यावर खूप जड दागिने वापरण्याची गरज नसते. उलट, नाजूक मंगळसूत्र लुकला अधिक उठाव देऊ शकते. दुसरीकडे, साध्या रंगाची किंवा प्लेन साडी असेल तर मंगळसूत्राला स्टेटमेंट अॅक्सेसरी म्हणून वापरता येते. यामुळे साडीचा साधेपणा कायम राहतो आणि दागिना संपूर्ण लुकचा फोकस बनतो.(फोटो सौजन्य :- @pranavsinghphotography)

लाल साडीत नेहाचा लुक

लाल साडीत नेहाचा लुक

लाल साडीतील नेहा पेंडसेचा हा पारंपरिक पण तितकाच स्टायलिश लुक सध्या लक्ष वेधून घेत आहे. लाल रंगाच्या साडीतील तिचा एलिगंट अंदाज.यावेळी नेहाने कानात मोठे कानातले कॅरी केले आहेत. पारंपरिक साडीला मॉडर्न ज्वेलरीची जोड देत नेहाने मंगळागौरीसाठी परफेक्ट फॅशन इन्स्पिरेशन दिलं आहे. (फोटो सौजन्य :- @nehhapendse)

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा