Headlines

शेखर गुप्ता यांचा कॉलम:आपल्या महान युद्धवीरांचे स्मरण ठेवणे गरजेचे‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎जनरल डगलस मॅकआर्थर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे‎– ‘जुने सैनिक कधी मरत नाहीत, ते फक्त विसरले‎जातात’. गेल्या आठवड्यात एका महान माजी‎सेनाध्यक्षांच्या स्मृतीच्या निमित्ताने हेच वास्तव समोर‎आले. या सेनाध्यक्षांना मारेकऱ्यांनी आपल्या गोळ्यांचे‎लक्ष्य बनवले होते. दोन ‘महावीर चक्र” (एमव्हीसी)‎मिळालेल्या केवळ सहा भारतीयांमध्ये त्यांचा समावेश‎होता. 1965 आणि 1971 च्या युद्धात दाखवलेल्या‎अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना हे सन्मान मिळाले होते. पुढे ते‎भारताचे 31 वे भूदलप्रमुख बनले आणि 31 जानेवारी‎1986 रोजी या पदावरून निवृत्त झाले. त्याच वर्षी पुण्यात‎दोन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. गेल्या 10 तारखेला‎त्यांची 40 वी पुण्यतिथी होती. पण कुठेही कोणतीही स्मृती‎सभा झाली नाही. कोणीही त्यांचे स्मरण केले नाही. अगदी‎लष्कराच्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक ट्विटसुद्धा‎झाले नाही. ते होते जनरल अरुण श्रीधर वैद्य.‎ ‘असल उत्तर”/ खेमकरण क्षेत्रातील लढाईत वैद्य यांनी 9‎कॅव्हलरी (डेक्कन हॉर्स) रेजिमेंटचे नेतृत्व केले होते‎पाकिस्तानी सैन्याच्या आर्मर्ड डिव्हिजनचा सफाया केला‎होता. यानंतर बसंतर, चकरा,देहिरा येथील रणगाड्यांच्या‎लढाईत त्यांनी 16 (इंडिपेंडंट) आर्मर्ड ब्रिगेडचे शानदार‎नेतृत्व केले. ‘असल उत्तर”/खेमकरणची लढाई ही या‎उपखंडातील सर्वात विनाशकारी व निर्णायक लढायांपैकी‎होती. तेथे वैद्य यांची रेजिमेंट आघाडीवर होती. युद्धातील‎अनुभवांच्या आधारे इंदिरा गांधी यांच्या सरकारने 1983‎मध्ये वैद्य यांना भूदलप्रमुख बनवले होते. वास्तविक पाहता‎ले. जनरल एस. के. सिन्हा हे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ होते‎आणि त्यांचीच वेळ होती. निर्णयाला राजकीय रंगही दिला ‎‎गेला. जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेल्या‎जवळीकीची शिक्षा सिन्हा यांना भोगावी लागल्याचे म्हटले ‎‎गेले. त्या काळी पंजाबमधील परिस्थिती बिघडत होती. ‎‎कायदा-सुव्यवस्था राखणे हे लष्कराचे काम नसतानाही ‎‎सुवर्णमंदिर मुक्त करण्याची जबाबदारी वैद्य यांच्यावर‎आली. 1962 च्या पराभवानंतर ऑपरेशन ब्लूस्टार ही‎लष्करी इतिहासातील सर्वात वेदनादायी घटना मानली‎जाते. कट्टरवाद्यांनी एक हिट लिस्ट तयार केली होती. यात ‎‎पहिली हत्या इंदिरा गांधी यांची झाली. त्यांच्या पाठोपाठ ‎‎ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणाऱ्या जनरल्सचा नंबर‎होता – वैद्य, कृष्णस्वामी सुंदरजी (ऑपरेशन ब्लूस्टार ‎‎दरम्यानचे वेस्टर्न आर्मी कमांडर), त्यांचे चीफ ऑफ‎स्टाफ ले. जनरल रणजीत सिंह दयाल आणि डिव्हिजन ‎‎कमांडर मेजर जनरल के. एस. ‘बुलबुल” ब्रार. या हिट ‎‎लिस्टमध्ये दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची नावेही होती. पैकी ‎‎ललित माकन व अर्जुन दास यांची दंगलीच्या काही ‎‎महिन्यांतच हत्या झाली. यानंतर ‘खालिस्तान कमांडो ‎‎फोर्स”च्या दोन मारेकऱ्यांनी बँका लुटल्या, पोलिसांची‎हत्या केली. लष्कराच्या कमांडर्सच्या मागे लागले.‎हरजिंदर सिंह ‘जिंदा” आणि सुखदेव सिंह ‘सुक्का” यांनी ‎‎लुधियानामध्ये (5.7 कोटी रुपयांची) बँक दरोडा‎टाकला. त्यानंतर त्यांनी मुंबईत डाका घातला. ते वैद्य यांना‎घेरण्याचा प्रयत्न करत होते. पण गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र‎पोलीस किंवा लष्कर कोणीही सतर्कता दाखवली नाही.‎वैद्य यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा एकच गनमॅन तैनात‎होता. हल्लेखोरांनी शेजारी येऊन वैद्य यांच्या डोक्यात‎गोळी झाडली. मारुती कारमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्या‎पत्नी भानू यांनाही चार गोळ्या लागल्या. सुदैवाने त्या‎वाचल्या. सुक्का व जिंदा यांना नंतर पकडले. येरवडा‎तुरुंगात खटला चालला व 1992 मध्ये त्यांना फाशी झाली‎. आपण ‘निर्दोष” आहोत, कारण वैद्य याच शिक्षेस पात्र‎होते, असे त्यांचे म्हणणे होते. ही बातमी आता दोन‎मुद्द्यांभोवती फिरते. पहिला मुद्दा असा की,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जिंदा-सुक्काचा खटला चालला तेव्हा पंजाब‎कट्टरवाद्यांच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात होता. सर्व‎संस्था हतबल झाल्या होत्या. पंजाब सरकारचे माजी मुख्य‎सचिव रमेशंदर सिंग यांनी त्यांच्या ‘टर्मोइल इन पंजाब”‎(हार्पर कॉलिन्स, भारत, 2022) या अधिकृत पुस्तकात‎लिहिल्याप्रमाणे, ‘मीडिया पूर्णपणे शरण गेला होता”. जिंदा‎आणि सुक्का यांनी लिहिलेले 21 पानांचे पत्र 26 जुलै 1990‎रोजी प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या दिवशी‎अनेक वृत्तपत्रांनी अंश छापले. ले. जनरल ब्रार यांच्यावरही‎30 सप्टेंबर 2012 रोजी लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला.‎त्यांनी तो हल्ला मोडून काढला. वैद्य यांच्याशी माझी‎पहिली भेट एका उदास सकाळी योगायोगाने झाली होती.‎त्याच्या आदल्या दिवशी, 19 फेब्रुवारी 1982 रोजी नागा‎बंडखोरांनी शीख रेजिमेंटच्या 21 व्या बटालियनच्या‎ताफ्याला घेरून हल्ला केला होता. त्यात एका मेजरसह‎20 सैनिक मारले गेले होते. त्याकाळी कोलकाताहून‎इंफाळची फ्लाईट गुवाहाटीमार्गे जात असे. वैद्य त्यावेळेस‎ईस्टर्न आर्मी कमांडर होते आणि कोलकाताहून याच‎विमानात बसले होते. मी गुवाहाटीला पोहोचलो आणि‎तेथून त्यांच्यासोबत विमानात चढलो. त्या घटनेमुळेच‎आम्ही दोघे हल्ल्याचे ठिकाण असलेल्या उखरुल‎महामार्गावरील नामथिलोककडे जात होतो.‎ उदास असलेल्या जनरलचे मन हलके करण्यासाठी मी‎सहानुभूती व्यक्त केली आणि सैनिकांच्या मृत्यूवर दुः ख‎व्यक्त केले. त्यावर वैद्य यांनी उत्तर दिले होते: “तुम्हाला‎आमचा पेशा समजणार नाही. लोक मारले जातात . हृदय‎कमकुवत आहे ते सैनिक बनू शकत नाहीत.’ वैद्य‎यांच्यासोबत झालेल्या संभाषणातील दोन गोष्टी मला‎स्पष्ट आठवतात. पहिली गोष्ट म्हणजे देशवासियांचा‎सामना करताना निर्माण होणारी द्विधा मनःस्थिती. त्यांचे‎मत अगदी स्पष्ट होते : “देशाच्या कायदेशीर निवडून‎आलेल्या सरकारविरोधात कोणी शस्त्र उचलल्यास‎त्याला देशद्रोहीच म्हटले जाईल. आमची शत्रूची व्याख्या‎हीच आहे.’ वैद्य यांना जिवाला धोका असल्याचा इशारा‎अनेकदा देण्यात आला होता. त्यावर त्यांचे‎तत्वज्ञानासारखे उत्तर असायचे : “मी दोन युद्धे लढलो‎आणि सुरक्षित बाहेर आलो. एखाद्या गोळीवर माझे नाव‎लिहिले असेल, तर ती मला शोधून काढेलच.” 10‎ऑगस्ट 1986 रोजी नेमके हेच घडले. वैद्य यांना आपण‎विसरून गेलो. आपल्या सर्व माजी सैनिकांना, महान‎युद्धवीरांना तसेच विसरून जायचे का?‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्वकर्ते‎कायदा – सुव्यवस्था राखणे हे लष्कराचे‎काम नव्हते. तरी सुवर्णमंदिर‎ मुक्त‎करण्याची जबाबदारी वैद्य यांच्या‎खांद्यावर आली. ऑपरेशन ब्लूस्टार ही‎लष्कराच्या इतिहासातील वेदनादायी‎घटना आहे. कट्टरवाद्यांनी ‘हिट लिस्ट”‎तयार केली होती. त्यात पहिली हत्या‎इंदिरा गांधी व नंतर ऑपरेशनचे नेतृत्व‎करणाऱ्या जनरल्सचा नंबर होता.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत