Headlines

Nashik Married Woman Rupali Patil in Resort for Lunch with Friend dies in Car Accident Crime News; मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळा


Nashik Woman Death : विवाहित महिला मित्रासोबत नाशिकमधील एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत होती, त्यावेळी एका भयंकर अपघाताने प्रवेशद्वाराजवळच तिचा करुण अंत झाला

Nashik Resort Rupali Patil (2)
रुपाली पाटील(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हा अपघात आहे, की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मित्रासोबत रिसॉर्टवर जेवायला

रुपाली नीलेश पाटील (वय ३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. रुपाली या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. मंगळवारी कंपनीच्या कामानिमित्त त्या एका मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. तेथून दोघे एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले.

नियंत्रण सुटून कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर धडकली

जेवण झाल्यानंतर रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराला धडकली. यामुळे रुपाली पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Maharashtra TimesTwisha Sharma : बायकोचे अवशेष उद्या न्यायला सांग, आता मला शांततेत मरु दे; Ex मिस पुणेचा वहिनीला शेवटचा मेसेज, काही मिनिटात मृत्यूला मिठी

कारखाली आल्याने अपघात की घातपात?

दरम्यान, वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा अपघाती मृत्यू झाला की, या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. रात्री उशिरापर्यंत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दीपक शिवाजी सैंदाणे (वय ४३) या संशयितास ताब्यात घेतले आहे.

रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली.

घटनेचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पिंपरीत चिमुकल्याचा अपघाती मृत्यू

दुसरीकडे, शिकवणीला जाण्यासाठी वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून निघालेल्या अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी पुणे जिल्ह्यातील पिंपरीत नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर घडली.

रिषभ पाटोळे (वय १०, रा. माण, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील संदीप पाटोळे (वय ३८) यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली. टेम्पो चालकाविरुद्ध बावधन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesNashik Murder : पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटातपाटोळे यांचे वाहन खड्ड्यात आदळून घसरले. या वेळी रिषभ शेजारून जाणाऱ्या ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.