Shatrughan Sinha On Sonakshi Sinha : झारखंड विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया न दिल्यामुळे सोनाक्षी सिन्हाला ट्रोल करण्यात आलेलं. त्यावर आता अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनाक्षीनं भूमिका न घेतल्यानं सोशल मीडियावर तिच्यावर टीका होत आहे. यापूर्वी तिनं NEET पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह काही सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर तिचं मत व्यक्त केलं होतं. अशातच आता अभिनेत्रीच्या ट्रोलिंगवर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षीच्या ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया
सोनाक्षी सिन्हा सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत व्यक्त करते. CJP आंदोलनाच्या वेळीही तिनं आपलं मत व्यक्त केलं होतं. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अभिनेत्रीनं पाठिंबा दिला होता. मात्र, झारखंडमधील अलीकडील विद्यार्थी आंदोलनावर सोनाक्षीनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर टीका करण्यास सुरुवात केली. या प्रकरणावर सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीनं काही दिवसांपूर्वी झारखंडमधील मुलांना पाठिंबा दिला होता, असं त्यांनी म्हटलं.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
माझ्या मुलीनं काही दिवसांपूर्वी झारखंड येथील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कधी कधी तिची राजकीय मते माझ्या मतांपेक्षाही अधिक मजबूत असतात. तिच्या ट्रोलिंगला भाजपा आयटी सेल जबाबदार आहे. त्यांनी पैसे देऊन सोनाक्षीला ट्रोल करण्यास सांगितलं होतं. ट्रोल करणारे, विरोध करणारे, अनेक लोक हे पैसे देऊन आणलेले ट्रोलर्स असतात. भाजपाचा आयटी सेल सोनाक्षीविरुद्ध ट्रोलिंग घडवून आणतो. ते ऑर्गेनिक ट्रोलिंग नाही. हे पैसे देऊन आणलेले ट्रोलर्स आहेत. ते बिचारे येतात. त्यांना काय बोलावं हेसुद्धा कळत नाही. पण मी हे ट्रोलिंग बघतसुद्धा नाही. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा