कार खरेदी करण्यापूर्वीच जाणून घ्या त्यावर आकारल्या जाणाऱ्या विविध करांविषयी.
एखादी कार खरेदी करताना त्यावर विविध प्रकारचे कर आकारले जातात. या सर्व करांची एकूण बेरीज गाडीच्या मूळ किंमतीशी जोडण्यात येते, तीच एकूण रक्कम गाडी खरेदी करताना ग्राहकाला मोजावी लागते. गाडीच्या मूळ किंमतीवर जीएसटी आकारली जाते. ही जीएसटी गाडीच्या प्रकारावर ठरते. जर कार पेट्रोल/सीएनजी/एलपीजीवर चालणारी असेल आणि आकाराने त्यामानाने लहान असेल तर त्या गाडीवर 18% जीएसटी आकारण्यात येते. जर गाडीचे इंजिन 1500cc पेक्षा जास्त पॉवर जनरेट करणारे असेल तर अशा वाहनांच्या किंमतीवर 40% जीएसटी आकारण्यात येते, तर मोठ्या SUV साठीही जीएसटीचा दर 40% आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीवर 5% जीएसटी दर कायम आहे.
कोणकोणत्या प्रकारचे कर आकारले जाते?
एखादी कार खरेदी करताना कारच्या मूळ किंमतीवर वाहनाच्या प्रकारानुसार जीएसटी, रोड टॅक्स तसेच टीसीएस आकरण्यात येते. त्याचसह रजिस्ट्रेशन फी, इन्शुरन्स आणि काही इतर खर्चही गाडीच्या एकूण किंमतीत समाविष्ट असतात. रोड टॅक्स हा पूर्णपणे राज्य सरकारकडून आकरण्यात येणारा कर आहे. 10 लाखांच्या आत मूळ किंमत असणाऱ्या गाडीच्या किंमतीवर 11% दराने रोड टॅक्स आकारला जातो. तर 10 लाख ते 20 लाखांच्या दरम्यान गाडीची मूळ किंमत असेल तर 12% रोड टॅक्स भरावा लागतो. 20 लाखांहून जास्त किंमत असणाऱ्या वाहनांसाठी रोड टॅक्स दर 11% आहे. तर तुम्ही खरेदी केलेल्या गाडीचा टीसीएस आयकर विभागाकडे जमा होतो. जर गाडीची किंमत 10 लाखांच्या वर असेल तर 1% टीसीएस आकारण्यात येतो.
क्रेडिट कार्ड खराब झाल्यावर करायचं काय? Card ब्लॉक करण्यापासून ते मिळवण्यापर्यंत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाचला समजून घेऊयात पूर्ण गणित!
जर तुम्ही एखादी कार खरेदी करत आहात आणि त्या कारची मूळ किंमत 4,67,712 रुपये असेल तर त्यावर 18% जीएसटी आकारण्यात येईल. 18% जीएसटी आकारल्यामुळे किंमतीत 84,188 रुपयांनी वाढ होईल. या गाडीची टोटल एक्स शोरूम किंमत 5,51,900 रुपये इतकी असेल. तसेच राज्य सरकारकडून आकारण्यात येणारे 11% रोड टॅक्स 60,709.02 रुपये इतकी असेल. ही सगळी रक्कम जोडली तर 6,12,609.18 रुपयांचा आकडा समोर येतो. 10 लाखांहून कमी किंमत असणाऱ्या गाड्यांच्या किंमतीवर टीसीएस लागू होत नाही. तसेच इन्शुरन्सची किंमत पॉलिसीनुसार बदलत राहते. तसेच यात 600 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क जोडले तर गाडीची एकूण किंमत 6,13,209.18 रुपये इतकी येते. म्हणजेच साडे चार लाख किंमत असणारे वाहन घेण्याचा विचार केलात तर खिशात किमान साडे सहा लाखांची रक्कम तयार ठेवावी लागते.

