Headlines

Gratuity Calculation Formula; 5 वर्ष काम केल्यानंतर 20000 च्या बेसिक सॅलरीवर किती ग्रॅच्युइटी मिळेल? एक छोटा फॉर्म्युला सांगेल सगळा हिशोब


कोणत्याही ब्रेकशिवाय तुम्ही सलग पाच वर्षे एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल तर, नोकरी सोडताना किंवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी तुमचा मोठा आधार बनू शकते. ग्रॅच्युइटी म्हणजे तुमच्या मेहनतीबद्दल कंपनीकडून मिळणारे एक प्रकारचे बक्षीसच असते. पण तुम्हाला माहित्येय का की ग्रॅच्युइटीचे कॅलक्युलेशन कसे केले जाते?

तुमचा शेवटचा मूळ पगार किंवा बेसिक सॅलरी 20000 रुपये असेल आणि तुम्ही पाच वर्ष सलग कंपनीत सेवा देत असाल तर, तुम्हाला अंदाजे 57,692 रुपयांची ग्रॅच्युइटी मिळू शकते. ग्रॅच्युइटीचे सूत्र समजून घेऊया, ज्यामुळे तुम्ही स्वतः घरबसल्या तुम्हाला मिळणाऱ्या एकूण ग्रॅच्युइटीचे कॅलक्युलेशन करू शकाल.

Maharashtra Timesसेवानिवृत्ती म्हणजे टॅक्सपासून मुक्ती नव्हे! पगार नसला तरी कर भरावे लागतेच, रिटायर होण्याअगोदर जाणून घ्या महत्वाची गोष्ट

दीर्घकाळ केलेल्या कामाचे बक्षीस

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, मग खाजगी असो वा सरकारी, नोकरी करत असाल तर ग्रॅच्युइटी असा लाभ आहे ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला याची स्पष्ट जाणीव असायला पाहिजे. मूलतः ग्रॅच्युइटी नियोक्त्याकडून कर्मचाऱ्याला दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल दिले जाणारे रिवॉर्ड आहे. भारतात ‘पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट, 1972’ नुसार, 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कंपन्यांना ग्रॅच्युइटी अनिवार्य आहे.

ग्रॅच्युइटीसाठी किमान सेवेची अट

ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान पाच वर्षे सेवेची अट सरकारने घालून दिली आहे. तसेच अलीकडच्या Labour Laws मध्ये सुधारणा करून काही कर्मचाऱ्यांसाठी एक वर्षाचीही अट आहे, पण सर्वांसाठी नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास ग्रॅच्युइटीचे लाभ मिळणार नाहीत.

Maharashtra Timesपेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! लोकसभेत पेन्शनवाढीच्या मुद्द्यावर झाली चर्चा, Higher Pension संदर्भात दिली स्पष्टता

ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते?

ग्रॅच्युइटी कॅलक्युलेट करण्यासाठी एक सूत्र किंवा फॉर्म्युला निश्चित केला आहे, ज्यामुळे नोकरी सोडताना किंवा सेवानिवृत्त झाल्यावर कर्मचारीला किती ग्रॅच्युइटी मिळेल याचे खुद्द कॅलक्युलेशन करू शकेल. शेवटचा पगार म्हणजे मूळ पगार आणि महागाई भत्ता (DA) यांची बेरीज केली जाते. याव्यतिरिक्त, एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेल्या वर्षात सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ काम केले असेल, तर तेही पूर्ण एक पूर्ण वर्ष मानले जाते.

Maharashtra TimesMittal Steel Plant Attack: भारताचा मित्र रशियाकडून शत्रूसारखी कृत्य! स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचा कारखाना उद्धवस्त, वीज अन् उत्पादनात खंडतुमचा शेवटचा पगार (मूळ पगार + महागाई भत्ता) आणि एकूण सेवेची वर्षे आधार म्हणून वापरली जातात. सूत्र खालीलप्रमाणे आहे:

ग्रॅच्युइटीची रक्कम = (15 × शेवटचा पगार × एकूण सेवेची वर्षे) ÷ 26

(26 महिन्यातील कामकाजाच्या दिवसाची संख्या आहे आणि 15 प्रति वर्ष म्हणजे 15 दिवसांचा पगार.)

ग्रॅच्युइटी कॅलक्युलेट करणे खूप सोपं आहे. 20000 रुपये Basic Salary आणि 5 वर्षांची नोकरी या उदाहरणातून आपण ग्रॅच्युइटीचे गणित समजून घेऊया.

समजा एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सलग 5 वर्षे काम केले आणि मूळ पगार व महागाई भत्ता मिळून शेवटचा पगार 20000 रुपये होता, तर अशा स्थितीत ग्रॅच्युइटीचे कॅलक्युलेशन खालीलप्रमाणे केले जाईल:

(15 × 20000 × 5) ÷ 26 = 57,692.30 रुपये

या उदाहरणाप्रमाणे या कर्मचाऱ्याला एकूण 57,692.30 रुपयांची ग्रॅच्युइटी मिळेल.

ग्रॅच्युइटी क्लेम करण्याची प्रक्रिया

तुम्हाला कंपनीकडून ग्रॅच्युइटीचा दावा करायचा असेल तर, तुम्हाला फक्त फॉर्म I भरून नोकरी सोडल्याच्या 30 दिवसांत कंपनीच्या HR विभागाकडे सादर करावा लागेल. कोणत्याही कारणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांचे नॉमिनी किंवा कायदेशीर वारस देखील हा फॉर्म भरून कंपनीकडे सादर करू शकतात.

फॉर्मसोबत कर्मचाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा कॅन्सल केलेला चेक आणि रिलिविंग पत्र यांसारखी कागदपत्रे सादर करावे लागतील. फॉर्म सादर केल्यावर कंपनी तुमच्या नोंदींची पडताळणी करेल आणि नियमांनुसार ग्रॅच्युइटीची रक्कम 30 दिवसांत थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत