Nashik Guardian Minister Girish Mahajan: तब्बल १९ महिन्यांनी नाशिकला पालकमंत्री मिळाल्याने प्रशासकीय कामकाजासह सिंहस्थाच्या नियोजनालाही गती मिळणार आहे.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्याने आणि रायगडमध्येही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी निर्माण झाली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी चोवीस तासांतच, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती.
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, महाराष्ट्रात एक, दोन केंद्रात; संजय राऊतांचा भाजपवर घणाघातसिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने प्रतिष्ठेचे केले होते. हा वाद थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहचला होता. तरीही तो मिटला नव्हता. परंतु, गेल्या दीड वर्षापासून ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा मान मात्र महाजन यांच्याकडे राहिला होता. त्यामुळे महाजन अघोषित पालकमंत्री म्हणूनच कार्यरत होते.
रायगडची जबाबदारी गोगावलेंवर
मुंबई : तब्बल १९ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीचा आदेश सोमवारी काढला.
Nashik Dengue Cases: नाशिकमध्ये डेंग्यूचा पुन्हा उद्रेक! चौदा दिवसांत 29 रुग्ण; साथीच्या आजारांचे रुग्णही वाढलेमहाजनांच्या नियुक्तीने भाजपमध्ये आनंदोत्सव
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपच्या वतीने ‘वसंतस्मृती’ कार्यालयात ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून स्वागत केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासोबतच नाशिकच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला. आगामी सिंहस्थानिमित्त रामकाल पथ व इतर विकास कामांकरिता ३५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा नक्कीच निर्विघ्न पार पडेल, असे मत शहराध्यक्ष केदार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले आहे.

