Headlines

LPG Gas Production Increased At Domestic Level ; आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत होतोय तयार! LPG गॅस निर्मिती संदर्भात घेतले महत्वाचे निर्णय, कडक निर्बंध लागू


पश्चिम आशियात वाढत्या तणावाची धास्ती भारताला लागून आहे. आखाती देशांवर होणारे परिणाम भारतातल्या घराघरातल्या स्वयंपाकालाही धक्का लावू शकतात, त्यामुळे भारत सरकार आधीच सतर्क असल्याचे दिसून येत आहे. एकूण 90% एलपीजी भारताकडून आयात केली जाते. एकंदरीत, भारत एलपीजी गॅससाठी मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे जर इतर देशातून भारताला मिळणार एलपीजी साठा थांबला तर याचा फार मोठा परिणाम भारताला भोगावा लागू शकतो. ही भीती लक्षात घेता, भारत सरकार स्वतः एलपीजी निर्माण करण्यावर लक्ष देत असल्याच दिसून येत आहे. भारतातील काही ऑइल कंपन्यांना एलपीजी प्रोडक्शन संदर्भात टार्गेट देण्यात आले आहेत. या कंपन्यांना सरकारकडून देण्यात आलेले लक्ष्य दिल्या गेलेल्या वेळेच्या आत गाठणे आवश्यक आहे.

या तेल कंपन्यांना देण्यात आली मोठी जबाबदारी

देशातील महत्वाच्या तेल कंपन्यांना भारत सरकारकडून एलपीजी निर्मितीची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिलायन्सकडे सगळ्यात मोठी जबाबदारी देण्यात आली असून कंपनीला दर दिवशी 18,000 टन एलपीजी उत्पादन करावे लागणार आहे. त्याखाली नायरा एनर्जीला 4,480 टन पर डे एलपीजी प्रोडक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. तर ओएनजीसी आणि GAIL या कंपन्यांना दिवसाला 6,460 टन एलपीजी गॅस निर्मितीचे लक्ष देण्यात आले आहे. अशा 21 तेल कंपन्यांना भारत सरकारने एलपीजी गॅस निर्मितीचे दैनंदिन लक्ष्य ठरवून दिले आहे. या कंपन्यांमध्ये खाजगी तसेच सरकारी दोन्ही प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे.

भारत एलपीजी उत्पादनावर इतका भर का देत आहे?

सध्या पश्चिम भारतात तणावाचे वातावरण आहे. त्यात आखाती देश भारताचे सगळ्यात मोठे एलपीजी आयातदार आहेत. Strait Of Hormuz या सागरी महामार्गावर अडथळे वाढण्याचे चित्र दिसून येत आहेत. याच सागरी महामार्गातून आखाती देशातील व्यापार चालतात, जर हा व्यापरमार्ग वाढत्या तणावामुळे भविष्यात बंद झाला तर भारताला कच्चा तेल मिळणे कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे ठप्पही होऊ शकते. या सगळ्या बाबी लक्षात घेत भारताने एलपीजी Backup तयार करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी देशातील महत्वाच्या तेल कंपन्यांना एलपीजी प्रोडक्शनचे लक्ष देण्यात आले आहे. जर भविष्यात एलपीजी संदर्भात काही आपत्कालीन परिस्थिति उद्भवली तर भारताकडे देशांतर्गत एलपीजी साठा आधीच तयार झालेला असेल.

भविष्यात गरज भासल्यास एलपीजीचे उत्पादन आणखीन वाढवले जाईल. विशेष म्हणजे भारताने आता भविष्यासाठी वाढवलेले एलपीजीचे उत्पादन लक्ष्य हे आधीच यंदाच्या अर्थव्यवस्थेत ठरवण्यात आलेल्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे. भारताने एलपीजी गॅससाठी आखाती देशांवर अवलंबून राहणे कमी केले असून अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा LPG आयातदार बनला आहे.

सामान्य नागरिकांच्या एलपीजी वितरणविषयीही कडक निर्बंध

Maharashtra Times8th Pay Commission : आयोगात 3.833 फिटमेंट फॅक्टरची चर्चा, जर लागू झाले तर कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन किती? समजून घ्या पूर्ण गणितआता सामान्य नागरिकांना एलपीजी बूक करताना काही काळाचा गॅप घ्यावा लागणार आहे. गावाकडच्या ग्राहकांनी जर आधीच एखादा एलपीजी गॅस सिलेंडर बूक केला असेल तर पुढच्या बूकिंगसाठी किमान 45 दिवस थांबावे लागणार आहे तर शहरातील ग्राहकांना 25 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे. जर एका ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त एलपीजी कनेक्शन असतील तर एक कनेक्शनसोडून इतर कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. एक ग्राहकाला फक्त एकच एलपीजी कनेक्शन ठेवता येणार आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत