Independence Day 2026 : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गॉलमध्ये टीम इंडियाने तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. गिल-गंभीरसह सचिन, विराट, रोहित आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देशवासीयांना खास शुभेच्छा दिल्या.

टीम इंडियाने गॉलमध्ये तिरंगा फडकावला
देश आज ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच भारतीय क्रिकेट विश्वानेही या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने गॉलमध्ये तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सचिनने तिरंग्यासोबतचा फोटो शेअर केला
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियावर तिरंग्यासोबतचा फोटो शेअर करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणाऱ्या सचिनने आपल्या खास अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गंभीरची सोशल मीडियावर पोस्ट
गौतम गंभीरनेही आपल्या पोस्टमधून देशासाठी बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहिली. ‘त्यांचे बलिदान. आपले स्वातंत्र्य. आपली जबाबदारी. भारत, जय हिंद’, असा संदेश त्याने दिला.
विराट, रोहित आणि लक्ष्मणकडूनही शुभेच्छा
माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जय शाह यांच्या देशवासीयांना शुभेच्छा
आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनीही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. तर बीसीसीआय क्रिकेट ऑफ एक्सलन्सचे संचालक आणि माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्वातंत्र्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासोबतच अधिक मजबूत आणि एकजूट भारत घडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन सोशल मीडियावरुन केले.
भज्जीची पोस्ट
माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही हा फाटो पोस्ट करत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
इरफान पठाण
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने त्याच्या वडिलांचा फोटो पोस्ट करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं लिहिलं.
शिखर धवनची खास पोस्ट
शिखरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “भारताची जर्सी परिधान करून घालवलेले क्षण हे माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद क्षण आहेत. त्या देशाचे आभार, ज्याने मला स्वप्न दिले, ते पूर्ण करण्याची संधी दिली आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचा आत्मविश्वास दिला. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.”

