Headlines

Paying Rent Using Credit Card; घर भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरताय? सावध रहा! आधी होणारे नुकसान जाणून घ्या


अनेकांना क्रेडिट कार्ड ही पद्धत फार सोयीची वाटते. आपल्याला पैशांची गरज आहे पण आपल्या खिशात फारसे पैसे नाहीयेत, अशावेळी क्रेडिट कार्ड फार उपयोगी ठरू शकते. पण ही पद्धत फक्त Emergency वेळीच वापरलेली कधीही सोयीस्कर, जर तुम्ही प्रत्येक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यावर भविष्यात फार मोठे आर्थिक संकट उद्भवू शकते.

अनेकदा काही हुशार मंडळी घराचे भाडे किंवा इतर EMI भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात. जर तुम्हीही हीच पद्धत वापरत असाल तर आत्ताच सावध राहा अन्यथा भविष्यात तुमच्या खिशाला फार मोठा खड्डा पडू शकतो. क्रेडिट कार्ड वापरण्याचेही काही नियम असतात. त्या नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही योग्य पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरला तर ते फायद्याचे ठरू शकते पण अनेकदा बहुतेक मंडळी क्रेडिट कार्डच्या नियमांना दुर्लक्षित करून या पद्धतीचा गैरवापर करतात आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात.

जर तुम्हीही क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या घराचे भाडे किंवा दर महिन्याचा EMI भरत असाल तर तुम्हाला काही नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. अनेकदा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या रकमेत व्यवहार करताना प्रोसेसिंग फी आकारली जाते. जर पेमेंट करणाऱ्या कंपनीकडून किंवा जागेच्या मालकाकडून अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात आले तर तुमच्या खिशावर भार वाढू शकतो.

उदाहरणार्थ., जर भाड्याची रक्कम 20,000 असेल आणि त्यावर प्रोसेसिंग फी रेट 2% असेल तर तुम्हाला भाड्याच्या रकमेत उगाचच 400 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. प्रत्येक ठिकाणी प्रोसेसिंग फी आकारली जात नाही जर ती आकारली गेली तर त्याचा दर साधारणता 1 to 3% इतका असू शकतो.

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्हाला दिलेल्या मुदतीच्या आत क्रेडिट बिल जमा करावा लागतो. जर तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत क्रेडिट बिल जमा करण्यात असक्षम ठरलात तर त्या रकमेवर व्याजदर मोजण्यात येतो. एकंदरीत, आधीच तुम्ही 20,000 रुपयांच्या जागी प्रोसेसिंग फी सह 20,400 रुपयांची रक्कम जमा कराल त्यात वेळेवर क्रेडिट कंपनीला पैसे परत केले नाही तर त्यावर संबंधित बँकेच्या नियमांनुसार व्याजदर आकारण्यात येईल.

क्रेडिट कार्डचा व्याजदर हा इतर व्याजदरांपेक्षा त्यामानाने जास्त असतो. समजा, तुम्ही पैसे परत करण्याची मुदत चुकवली आणि तुम्ही ज्या बँकेचा क्रेडिट कार्ड वापरता त्या बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी ठरवण्यात आलेला व्याजदर 3.5% असेल तर तुम्ही खर्च केलेल्या 20 हजारावर 700 रुपये प्रति महिना व्याज आकारण्यात येईल. त्यातसह लेट पेमेंट फीज, जीएसटी तसेच इतर चार्जेसही लागू शकतात.

भविष्यात कर्ज मिळण्यात अडचण

Maharashtra Times1947 मध्ये डॉलरची किंमत होती 3 रुपये 30 पैसे, 80 वर्षांत 95 चा आकडा कसा पार केला? इतिहास अन् गणित समजून घ्याजर तुम्ही आधीचीच रक्कम वेळेवर परत करणार नाहीत तर तुम्हाला कोण कशालाच कर्ज देण्याच्या भानगडीत पडेल. जेव्हा तुम्ही नियमित क्रेडिट कार्डचा वापर करता तेव्हा तुमचा युटीलायझेशन स्कोर वाढतो आणि याचा नकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL Score वर होतो. जर तुमच्या क्रेडिट कार्ड एक लाखांचा आहे आणि तुम्ही त्यातली चाळीस हजारांची रक्कम आधीच खर्च केली असेल तर तुमचा युटीलायझेशन स्कोर 40% असतो. साधारणतः हा स्कोअर 30% च्या आत असावा अन्यथा CIBIL Score नकारात्मक होतो आणि भविष्यात पुन्हा कर्ज मिळवण्यास अडचणी उद्भवू शकतात.

जर तुम्ही खर्च केलेली पूर्ण रक्कम न भरता फक्त बँकेकडून निश्चित करण्यात आलेली किमान रक्कम भरली तर त्या शिल्लक रकमेवर व्याज आकारण्यात येतो. त्यामुळे शक्यतो आपातकालीन परिस्थितीतच क्रेडिट कार्ड वापरणे योग्य ठरते. प्रत्येक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरला आणि पैसे वेळेवर परत केले नाहीत तर आपल्याच खिशाला भेग पडतो.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत