Headlines

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा १५ ऑगस्टला भूमिपूजन सोहळा


​सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळवणे येथे आज शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३ वाजता हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली तर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि कोकणाच्या औद्योगिक प्रगतीला अधिक बळ देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या शुभ संकल्पनेतूनच तळवणे येथे या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.
​या विशेष सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर,सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीम. सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक आणि तळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद केरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
​झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत