Headlines

Tata Steel Sold Jamshedpur FC ; टाटा स्टीलवर 100 रुपयात फुटबॉल क्लब विकण्याची वेळ का आली? आतापासून चर्चिल ब्रदर्स Jamshedpur FC चे सर्वेसर्वा


दोन दिवसांपूर्वी टाटा समूहाकडून अशी बातमी आली, ज्यानंतर टाटा समूहाच्या काही शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. टाटा सन्सचे चेअरमन N Chandrasekaran यांनी पदाचा राजीनामा दिला होता, परंतु संपूर्ण कार्यकाल पूर्ण करूनच रजा घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. अशामध्ये टाटा समूहाकडून आणखीन एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टाटा स्टीलने जमशेदपूर एफसीचे सर्व कार्यभार गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सकडे सुपूर्त केले आहे. आतापासून चर्चिल ब्रदर्सच Jamshedpur fc चे सर्वेसर्वा आहेत.

टाटा स्टीलने जमशेदपूर एफसी फक्त 100 रुपयांत विकली आहे. टाटा स्टीलने जारी केलेले जमशेदपूर फुटबॉल क्लबचे जवळपास 40.8 कोटींचे शेअर फक्त 100 रुपयांच्या किंमतीत चर्चिल ब्रदर्सला मिळाले आहेत. टाटा स्टीलने फक्त 100 रुपयांत पूर्ण फुटबॉल क्लब विकण्यामुळे निश्चितच चर्चेला उधाण आले आहे.

टाटा स्टीलवर 100 रुपयात फुटबॉल क्लब विकण्याची वेळ का आली?

टाटा स्टीलने चर्चिल ब्रदर्स यांना Jamshedpur FC विकून टाकली. ही रक्कम फक्त हस्तांतरित करण्यासाठी तसेच कायदेशीररीत्या वैध करण्यासाठी आकरण्यात आली आहे. जमशेदपूर फुटबॉल क्लबची खरी रक्कम 100 रुपये नाही. याउलट, टाटा स्टीलकडे या फुटबॉल क्लबचे 40.8 कोटींचे 100% शेअर्स होते. आर्थिक स्थितीतील संचित तोट्यामुळे कंपनीची नेट व्यर्थ नकारात्मक दिसून येत होती. फुटबॉल क्लबवरील वाढते भार पाहता त्यातून मागे हटण्याचा मार्ग टाटा स्टीलला जास्त सोयीस्कर वाटला आणि जमशेदपूर एफसी फक्त 100 रुपयांत विकली गेली.

मुळात, 100 रुपये फक्त कायदेशीर प्रक्रियेसाठी आकरण्यात आलेली रक्कम आहे. चर्चिल ब्रदर्स यांनी 100 रुपयांमध्ये Jamshedpur FC च्या 100% शेअर्सवर मालकी हक्क तर मिळवलाच आहे तर त्याचबरोबर या फुटबॉल क्लबचे सर्व कर्ज फेडण्याची तसेच नुकसानाला सामोरे जाण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. महत्वाचे म्हणजे या व्यवहाराआधीच जमशेदपूर एफसीने ISL 2026-27 मधून माघार घेतली होती. त्याकाळी टाटा स्टीलने घेतलेल्या या निर्णयामुळेच अनेकांनी फुटबॉल क्लबच्या भविष्यातील व्यवसायविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

Maharashtra TimesGold Jewellery: सोने-चांदी गुलाबी कागदात गुंडाळण्यामागे ज्वेलर्सची दूरदृष्टी; पिवळा किंवा इतर रंगाचा का नाही? तुम्हालाही माहीत नसेल उत्तरमोठी आर्थिक जबाबदारी असूनही चर्चिल ब्रदर्सने ही संधी का स्वीकारली?

चर्चिल ब्रदर्स यांनी या व्यवहाराकडे ISL मध्ये पुन्हा एंट्री घेण्याचे मार्ग म्हणून पाहिले आहे. चर्चिल ब्रदर्स गोव्याचा जुना फुटबॉल क्लब आहे तसेच या क्लबने दोन वेळा आय-लीग जिंकली आहे. क्लब आधीपासूनच ISL मध्ये येण्याच्या संधीच्या शोधात होता. टाटा स्टीलच्या या व्यवहाराच्या माध्यमातून चर्चिल ब्रदर्स यांना फक्त 100 रुपयांमध्ये आयएसएलमध्ये येण्याची संधी मिळाली आहे तसेच त्या संबंधित असणारा परवानाही मिळाला आहे. त्याचबरोबर जमशेदपूर एफसीच्या 12 खेळाडू आणि 2 कोच यांचा करारही मिळाला आहे. आयएसएलमध्ये शून्यापासून सुरुवात करण्यापेक्षा आधीपासूनच तयार झालेल्या साम्राज्याचा कार्यभार हातात घेऊन आयएसएलच्या मैदानात उतरणे त्यांच्यासाठी उत्तम संधी असल्याचे त्यांना वाटले.

दिवेश दिनेश

लेखकाबद्दलदिवेश दिनेशदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत