Headlines

नवी मुंबईकरांचा प्रवास होणार सुखद, ‘एनएमएमटी’कडे ३० नवीन बस; टप्प्याटप्याने दाखल होणार १५० बसगाड्या| Maharashtra Times


NMMT Buses: नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, बोरिवली, उरण ते खोपोलीपर्यंत एनएमएमटीच्या बस धावतात. वर्षभरात एनएमएमटीच्या ताफ्यात १५० बस दाखल होणार असून नवी मुंबईकरांना मोठा फायदा होणार

नवी मुंबई बस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ताफ्यात एनएमएमटीच्या सीएनजीवर धावणाऱ्या १५० नव्या बसगाड्या वर्षभरात दाखल होणार आहेत. त्यातील ३० बस पहिल्या टप्प्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली प्रवासी वाहतूक सेवा मिळू शकेल. विद्युत बसमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता यापुढे सीएनजी बस खरेदी करण्याकडे परिवहनचा कल राहणार असल्याचे सांगण्यात आले.

बसफेऱ्या वाढणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात अर्थात एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या ३५० बस आहेत. नवी मुंबईबरोबर पनवेल, उरण, खोपोली, कल्याण डोंबिवली, बोरिवली मंत्रालयापर्यंत या बस धावत आहेत. एनएमएमटीच्या बसमध्ये महिलांना तिकीटासाठी निम्मे दर आकारले जात आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांनी सवलत दिली जाते. त्यामुळे एनएमएमटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर बस वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र बसगाड्यांच्या कमतरतेमुळे विविध मार्गांवर बस फेऱ्या वाढवता येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बससाठी प्रतीक्षा करत राहावे लागत आहे. बसफेऱ्या वाढवण्यासाठी बस संख्या वाढवणे अपेक्षित आहे. त्यासाठी १५० नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने गेल्या वर्षी घेतला होता. सीएनजीवर धावणाऱ्या बस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेण्यात आला होता. त्यानुसार आता या बस यायला सुरुवात झाली आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईत रेल्वे स्थानकांचा विकास होणार, तीन स्थानकं ‘सिडको’कडून मध्य रेल्वेच्या ताब्यात; कुठे-कसा होणार फायदा?

इलेक्ट्रिकल बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवासी आणि वाहनचालक यांच्यात वाद होत असतात. त्यामुळे इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याऐवजी सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. त्यानुसार

पुढच्या महिन्यात २० बस दाखल होणार

आता पहिल्या टप्प्यात या ३० बस परिवहनमध्ये दाखल झाले आहेत. टप्प्याटप्प्याने यातील बस यापुढे येत राहणार आहेत. सध्या आलेल्या बस परिवहनच्या घणसोली येथील आगारात उभ्या आहेत. पुढच्या महिन्यात यातील वीस बस येणार आहेत. अशी माहिती परिवहनच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Maharashtra TimesAiroli-Katai Naka Project: ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला

या सर्व बसची खरेदी स्वतः परिवहन उपक्रमाने केली आहे. त्यामुळे या बसच्या माध्यमातून येणारे सर्व उत्पन्न परिवहनच्याच खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या बस परिवहन उपक्रमासाठी ही फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास उपक्रमाने व्यक्त केला आहे. शिवाय प्रवाशांनाही या बसच्या माध्यमातून चांगली बस सेवा उपलब्ध करून देता येणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा