मागील काही दिवसांपासून देश-विदेशातील सराफा तसेच MCX व COMEX वर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये तेजीचा कल पाहायला मिळाला. यामुळे एकीकडे गुंतवणूकदारांच्या दरवाडीच्या आशा उंचावल्या तर, खरेदी करणाऱ्यांच्या खिशावरील भार वाढला. त्यामुळे आजच्या थंड व्यापारामुळे सर्वसामान्य खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला असेल.
सोने-चांदीचा आजचा दर काय
गुरुवारी सकाळी, 13 ऑगस्ट 2026 रोजी, कॉमेक्सवर सोन्याचा दर किंचित वाढून $4,468.90 वर पोहोचला तर, चांदीचा दर 0.23% घसरून $65.550 झाला. अशाप्रकारे, MCX वरील सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार होत असून 1.54 लाख रुपयांवर व्यवहार करत आहेत. तसेच चांदीचा भाव किंचित घसरून 2.37 लाख रुपये किलोवर स्थिर राहिले आहेत. अशा स्थितीत, तुमच्या शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे? जाणून घेऊया
सोने आणि चांदीच्या दरात किती बदल?
गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून क्रूडमध्ये सतत दरवाढीचा कल पाहायला मिळाला मात्र मात्र, आजच्या घसरणीचा परिणाम कमोडिटी बाजारावरही होत आहे. जागतिक कमोडिटी एक्सचेंज बाजारात सकाळपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होताना हीच अस्थिरता देशांतर्गत कमोडिटी बाजारातही पाहायला मिळू शकते.
गेल्या काही दिवसांत सोन्याची किंमत जवळपास 7 आठवड्यांतील उच्चांकीनजीक पोहोचलेली, ज्याचा गुंतवणूकदार फायदा घेत आहेत. मात्र दुसरीकडे गुंतवणूकदार अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवरही बारकाईने लक्ष ठेवून असतील ज्याच्या आधारे फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीत व्याजदरांबद्दल निर्णयाबाबत संकेत मिळतील.
मुंबईतील सोने आणि चांदीचे दर
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,870 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,110 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,960 रुपये प्रति 10 ग्रॅम
आणि चांदीचा भाव 2,54,900 रुपये किलो आहे.
अमेरिकी बाजारातील हालचाली
डॉलर इंडेक्सने पुन्हा 100.02 ची पातळी गाठली, ज्यामुळे अमेरिकी चलनात निश्चित होणारी मौल्यवान धातूंची किंमत (उदा. सोने) इतर चलनांमधील खरेदीदारांसाठी महाग झाली. परिणामी मागणीत शिथिलता दिसून येताना या आठवड्यात आतापर्यंत डॉलर इंडेक्सने सुमारे 0.50% झेप घेतली. दुसरीकडे अमेरिकेच्या 10-वर्षीय बॉन्ड यील्डचा दर 4.69% पर्यंत वाढला, ज्यामुळे सोन्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर काहीसा नकारात्मक परिणाम झाला.
भारताचं तांदूळ नैसर्गिक नसल्याचे सांगत चीनकडून बंदी; 7 निर्यातदारांची नोंदणीच तात्पुरती रद्ददरम्यान, ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’च्या आकडेवारीनुसार जूनमध्ये 0.4% घट झाल्यानंतर जुलैमध्ये अमेरिकेचा CPI निर्देशांक महिना-दर-महिना आधारावर 0.1% वाढला.
तसेच महागाई आणि रोजगार बाजारातील सध्याच्या ट्रेंडनुसार अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढीस विलंब करू शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता 40% असल्याचे व्यापाऱ्यांना वाटते, जी आठवड्याभरापूर्वी सुमारे 54% इतकी शक्यता होती असे CME FedWatch Tool वरून समोर येते.

