Affordable homes in USA: अमेरिकेतील ट्रेलर हाऊसचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही घरं कारखान्यात लाकूड आणि फायबर प्लास्टिकपासून तयार केली जातात आणि विशिष्ट ठिकाणी बसवली जातात. या घरांच्या निर्मितीसाठी खूप कमी खर्च येतो. पण या घरांची रचना भारतामधील श्रीमंत लोकांच्या घरांपेक्षाही खूप चांगली असते.

(फोटो सौजन्य – ryan.sayed/Instagram)
कशी तयार केली जातात ही घरं?
हा व्हिडीओ ryan.sayed या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका भारतीय तरुणाला पाहू शकता जो अमेरिकेतील गरीबांची घरं आतमधून कशी दिसतात हे दाखवतोय. या घरांना ट्रेलर हाऊस असं म्हटलं जातं.
अमेरिकेतील नियमानुसार ही घरं या घरांमध्ये ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाची लोकं राहू शकतात. वृद्ध मंडळींना काही वर्षांसाठी लीजवर सरकारतर्फे जमिनीचा एक छोटासा भाग दिला जातो. त्यावर ही घर तयार केली जातात. लक्षवेधी बाब म्हणजे हे ट्रेलर हाऊस भारतासारखे विटा सिंमेटपासून तयार केले जात नाही. तर कारख्यान्यात लाकूड आणि प्लास्टिक फायबर पासूुन तयार केली जातात. आणि मग त्या जागेवर जाऊन जोडली जातात. या घरांना गाडीसारखी चाकं देखील बसवलेली असतात जेणेकरून लीज संपली की लोकं हे ट्रेलर हाऊस घेऊन दुसरीकडे जातात.
(फोटो सौजन्य – El Capra/pexels.com)
मेंटेनेससाठी खर्च येतो कमी
या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रेलर हाऊसच्या निर्मितीसाठी कमी खर्च येतो आणि त्यांना मेंटेन करणं देखील सोपं जातं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे वरकरणी हे घर गरीबांचं वाटत असलं तरी स्टीलच्या फ्रेमवर उभारलेल्या या घरामध्ये बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरूम आणि हॉल अशा सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा असतात. किंहबूना ही अॅसेंबल केलेली लाकडी घरं भारतामधील श्रीमंत लोकांच्या बंगल्यापेक्षाही सुंदर आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी भरलेली असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो, पण ही गरीबांची घरं तुम्हाला कशी वाटली? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

