Tukaram Mundhe Action: तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी कारवायांची चर्चा सुरू असतानाच एका तरुणाने त्यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईट तयार केली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

वेबसाईटची निर्मिती कशी झाली?
हा व्हिडीओ asakelapahije या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे हे सध्या अनेक मोठ्या हॉटेल्सवर, मोठमोठ्या फूड ब्रँड्सवर, दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या डेअऱ्यांवर आणि मिठाईच्या दुकानांवर कारवाया करत आहेत. ‘भेसळयुक्त पदार्थ, जिथे तुकाराम मुंढे तिथे,’ अशी स्थिती सध्या राज्यभरात आहे. अन् त्यांचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी या व्हिडीओमधील तरुणानं आपल्या मित्र-मंडळींच्या मदतीनं एका वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला FDA संदर्भात सर्व प्रकारची माहिती मिळेल. तसंच, जर तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कुठेही भेसळयुक्त पदार्थ दिसला, तर त्याबाबत तक्रार करून ती तक्रार तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचीदेखील सोय केली आहे.
हा व्हिडीओ झाला होता व्हायरल
हा व्हिडीओ २ लाख २४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. आणि या वेबसाईटच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेला व्हिडीओ तब्बल २६ लाख वेळा पाहिला गेलाय. असो, भेसळयुक्त पदार्थ शरीरासाठी किती घातक आहेत, हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पोटदुखी, उलट्या, जुलाब, अन्नातून विषबाधा आणि ऍलर्जी यांसारख्या समस्या भेसळयुक्त पदार्थांमुळे होऊ शकतात. काही प्रकारच्या भेसळीचा दीर्घकाळ संपर्क आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो. अन् खाण्याच्या पदार्थांमधील ही भेसळ तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमुळे हळूहळू आता कमी होऊ लागल्याची चर्चादेखील होताना दिसत आहे.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

