Headlines

Actress Shakeela : मोबाईलवर रील्स पाहणं, गेम खेळणं अभिनेत्रीला पडलं महागात, सर्जरीवर झाला ३ लाखांचा खर्च


Actress Shakeela Surgery : दाक्षिणात्य अभिनेत्री शकीलाला जास्त वेळ मोबाईल वापरणं महागात पडलं असून अभिनेत्रीला मानेची सर्जरी करावी लागली आहे.

south actress shakeela suffered from neck surgery
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री शकीलाला फोनच्या अतिवापरामुळे तिच्या मानेची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यासाठी तिला जवळपास ३ लाख रुपये खर्च आला. रुग्णालयातून घरी आल्यानंतर, तिनं एक व्हिडिओ शेअर केला असून हेल्थ अपडेट शेअर केली आहे.

स्मार्टफोनचा अतीवापर अभिनेत्रीच्या अंगाशी

शकीलानं सांगितलं की, फोनवर जास्त वेळ गेम्स खेळल्यामुळे आणि रील्स पाहिल्यामुळे तिला शारीरिक त्रास जाणवायला लागला. ती अनेकदा चुकीच्या स्थितीत झोपून बराच वेळ मोबाईल वापरायची. या अनुभवावरून, अभिनेत्रीनं तिच्या चाहत्यांना फोनचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला. अभिनेत्रीनं पालकांनाही त्यांच्या मुलांना मोबाईल देण्यापूर्वी दोनदा विचार करण्याचा इशारा दिला.

Maharashtra TimesPriya Rajvansh : दिग्दर्शकावर प्रेम करणं पडलं महागात, संपत्तीमुळे अभिनेत्री मृत्यूच्या दाढेत, बॉयफ्रेंडच्याच बंगल्यात सापडली बॉडी; काय घडलेलं?
अभिनेत्री शकीलानं सांगितलं की, ती अनेकदा एका कुशीवर झोपून फोन वापरायची. ती सलग चार तास मोबाईलवर गेम्स खेळायची आणि चहा किंवा कॉफीसाठी थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा मोबाईल घ्यायची. ती यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्यातही बराच वेळ घालवायची. अभिनेत्रीनं सांगितलं की, या चुकीच्या स्थितीत फोनचा जास्त वापर केल्यामुळे तिच्या मानेतील नसांवर गंभीर परिणाम झाला आणि त्यामुळे तिला मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

शस्त्रक्रियेनंतर शकीलानं सांगितलं की, मोबाईल हे एक खूप उपयुक्त साधन असलं तरी, त्याचा अतिवापर हानिकारक आहे. सध्या, ती तिच्या रोजच्या जीवनातील अगदी साध्या कामांसाठीही इतरांवर अवलंबून आहे. फक्त अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल वापरावा, असा सल्लाही अभिनेत्रीनं दिला. ‘तुमचा फोन फक्त आवश्यक कामांसाठीच वापरा. ​​अनावश्यक व्हिडिओ पाहणं टाळा. नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल आणि माझ्यासारखा तुमचंही ३ लाखांचं नुकसान होईल.’

Maharashtra TimesPooja Bedi : लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, 8 वर्षांपूर्वी साखरपुडा; सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, ‘आता माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही’
दरम्यान, शकीलानं १९९० च्या दशकात तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. ‘किन्नरथुंबिकल’ या मल्याळम चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर ती रातोरात प्रसिद्ध झाली. नंतर अभिनेत्रीनं ‘छोटा मुंबई’ आणि ‘तेजा भाई अँड फॅमिली’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. मल्याळम व्यतिरिक्त, शकीलानं तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. गेल्या दशकात, तिनं बोल्ड भूमिका सोडून चरित्रात्मक भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा