Anupama Parameswaran On Her Relationship : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रीचा छळ झाला
धन्या वर्माला दिलेल्या मुलाखतीत अनुपमानं सांगितलं की, तिच्या रिलेशनशिपचा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. स्वतःच्या एका पोस्टचा संदर्भ देत अभिनेत्री म्हणाली की, ‘त्या एका पोस्टमागे दोन वर्षांच्या वेदना, शारीरिक आणि भावनिक खच्चीकरण दडलेलं होतं.’ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘तुम्हाला आयुष्यात शांतता मिळवायची असेल तर शेवटी सगळं सोडून द्यावं लागतं.’
Sunil Lahri : ‘Gen Z, Gen Alpha ही आपली संस्कृती नाही, पुढच्या पिढीसाठी आपण कोणते शब्द वापरत आहोत?’ ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य
अनुपामा म्हणाली की, ‘मी सोशल मीडियावर जी पोस्ट केली, ती काही उगाचच मला वाटतं म्हणून अचानकपणे केलेली नाही. मी विचारपूर्वक आणि वेळ घेऊन केलेली ती पोस्ट होती. त्या पोस्टमागे दोन वर्षांच्या वेदना, शारीरिक आणि भावनिक त्रास यांचा अनुभव होता. मी पूर्णपणे यातून सावरल्यानंतर मी ती पोस्ट केली होती. त्या नात्यामुळे मला खूप त्रास झाला आणि त्याचा माझ्या शरीरावर परिणाम झाला. या काळामध्ये मी स्वतःला हरवून बसले होते आणि त्यामुळे माझं वजन खूप कमी झालं होतं. आयुष्यामध्ये प्रगती होत असली तरी मला आनंद होत नव्हता. उलट, मला अजून खचल्यासारखं वाटायचं.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
अनुपमानं केला ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा सामना
अनुपमा पुढे म्हणाली की, ‘मी दोन वर्षे ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा (Narcissistic Abuse) सामना केलाय. दररोज समोरच्या व्यक्तीची कोणती बाजू पाहायला मिळेल, याची भीती वाटत होती. हे शंकरच्या ‘अन्नियन’ चित्रपटातील हीरोप्रमाणे वागणं आहे. एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी रूपं असतात. एखाद्या दिवशी तो आपल्यावर खूप जास्त प्रेम करतो किंवा खूप काळजी असल्याचं दाखवून देईल. जगातील सर्वांत भाग्यवान व्यक्ती असल्यासारखी वागणूक देईल. पण, दुसऱ्याच दिवशी त्याची सर्वात क्रूर बाजू समोर येईल. आजूबाजूला काय घडत आहे याची त्याला अजिबात पर्वा नसेल. त्यानंतर पुढच्या दिवशी तो सर्व चुका मान्य करून लहान मुलासारखा रडेल. सर्व चुकांसाठी माफी मागेल आणि पुन्हा असं करणार नाही, असा शब्द देईल आणि त्यानंतर पुन्हा हेच चक्र सुरू राहील’
Pooja Bedi : लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, 8 वर्षांपूर्वी साखरपुडा; सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, ‘आता माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही’
‘मी पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये मेडोना सेबॅस्टियनला या प्रकारच्या शोषणाबद्दल बोलताना पाहिलं होतं. ते बघून माझे माय थरथर कापत होते. अजूनही असे खूप जण आहेत, ज्यांना नार्सिसिस्टिक ॲब्यूजबद्दलची माहिती नाही.’ असंही अनुपमानं शेवटी सांगितलं.
Priya Rajvansh : दिग्दर्शकावर प्रेम करणं पडलं महागात, संपत्तीमुळे अभिनेत्री मृत्यूच्या दाढेत, बॉयफ्रेंडच्याच बंगल्यात सापडली बॉडी; काय घडलेलं?
दरम्यान, अनुपमा परमेश्वरननं २०१५ मध्ये ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून मेरी जॉर्जची भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिनं मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘ए आ’, ‘कोडी’, ‘सथामनम भवती’, ‘कार्तिकेय 2’, आणि ‘थिल्लू स्क्वेअर’ यांसारख्या सिनेमांमध्ये अनुपमानं काम केलं आहे.

