Headlines

ला संपविण्यामागे पैशांची किनार? माहेरच्यांचा गंभीर आरोप


मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांच्या मृत्यूनंतर महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी स्वत:ला संपवून घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. पण या घटनेनंतर सोनाली यांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

Sonali Gaikwad
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच अवघ्या महिनाभरात त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनीही आत्महत्या केली. या घटनेमुळे दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. दरम्यान, सोनाली यांच्या आत्महत्येला आर्थिक मदतीची किनार असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

नागेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळाली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, या मदतीतील ६० टक्के रक्कम नागेश यांच्या आईला, तर ४० टक्के रक्कम पत्नी सोनाली यांना मिळाली.

याच पैशांच्या वाटपावरून सोनालीला सासू-सासऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. नागेश यांच्या मृत्यूला सोनालीला जबाबदार ठरवलं जात होतं आणि त्यावरूनही तिला त्रास दिला जात असल्याचा दावा तिच्या भावाने केला आहे.

आत्महत्येच्या वेळेबाबतही नातेवाईकांचा संशय

सोनालीने दुपारीच आत्महत्या केली होती, मात्र कुटुंबीयांना संध्याकाळी सातच्या सुमारास याची माहिती देण्यात आल्याचा दावा तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. सोनालीचे आई-वडील घरापासून जवळच राहत असताना त्यांना तात्काळ माहिती का देण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनालीने काही वेळापूर्वी आई-वडिलांना फोन करून मोशीला येण्यास सांगितल्याचा दावाही नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय असल्याचे ते सांगत आहेत.

सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

सोनालीच्या भावाने आणि भाच्याने सासू-सासऱ्यांकडून तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मात्र, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पतीच्या मृत्यूनंतर सोनाली मानसिक तणावात आणि दुःखी होती. त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दोन चिमुकल्या मुलींचं काय?

नागेश गेले…आणि महिनाभरात सोनालीही गेल्या… आई-वडील दोघांनाही गमावलेल्या या दोन चिमुकल्या मुली आता पोरक्या झाल्या आहेत. आत्महत्येमागे नेमकं कारण काय? आर्थिक मदतीवरून खरंच वाद झाला होता का? सोनालीच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मोशी दुर्घटना काय होती?

पुण्यातील मोशी येथील कचरा डेपोमधील कचऱ्याचा मोठा ढिगारा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या घटनेत 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. संबंधित घटना ही 8 जुलै 2026 रोजी घडली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 84 तास बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा