Headlines

Uttarakhand Shuddhikaran Row : शुद्धीकरणावरून खरगे संतापले, राज्यसभेत भाजपकडून माफी, नेमकं काय घडलं? – congress leader mallikarjun kharge target bjp in rajyasabha over shuddhikaran havan performed at ramlila maidan


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशातील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या अध्यक्षांची सभा होते आणि सभा संपल्यानंतर दोन दिवसांनी जिथे ही सभा झाली त्या व्यासपीठाचं अन् मैदानाचे शुद्धीकरण करण्यासाठी हवन केले जाते, गंगाजल शिंपडले जाते… ऐकायला थोडे अस्वस्थ करणारे वाटत असले, तरी ही घटना नुकतीच घडली आहे… उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे. या घटनेनंतर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर घडलेल्या या घटनेचे पडसाद थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत उमटले. नेमकं हल्द्वानीत काय घडलं? या सगळ्या प्रकरणावर मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले, राज्यसभेत हा मुद्दा कसा गाजला आणि भाजपने यावर काय स्पष्टीकरण दिले? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत