Realme 16x 5G हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन 7000mAh ची मोठी बॅटरी, 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले यासह MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. Realme 16x 5G हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला असून या फोनची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
लाँच ऑफरअंतर्गत ग्राहकांना 2000 रुपयांची सूट किंवा 3000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. Realme 16x 5G हा स्मार्टफोन आज 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसर
Realme 16x 5G या फोनमध्ये 6.8-इंच HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1200 nits पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Realme 16x 5G हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो.
Realme 16x 5G यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 6GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह जोडला गेला आहे. कंपनीने चांगल्या गेमिंगसाठी 5300 स्क्वेअर एमएम एअरफ्लो व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आणि जीटी बूस्ट गेमिंग इंजिन देखील दिले आहे, ज्यामुळे फोन बराच काळ गेम खेळल्यानंतरही कूल राहील.
Realme 16x 5G बॅटरी आणि किंमत
Realme 16x 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 16x 5G यात बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. Realme 16x 5G फोनचे वजन 217 ग्रॅम आहे आणि जाडी 8.88 मिमी आहे. किंमतीबद्दल बोलताना…
- Realme 16x 5G 4 GB + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रुपये आहे.
- Realme 16x 5G 6 GB + 128 GB व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे.
- Realme 16x 5G 6 GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे.
- Realme 16x 5G हा फोन एन्ड्युरन्स ब्राऊन आणि ग्लोरी व्हाईट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
Realme 16x 5G कॅमेरा आणि AI फीचर
Realme 16x 5G च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Realme 16x 5G मध्ये 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Realme 16x 5G यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Realme 16x 5G फोनमध्ये एआय इरेझर, एआय अल्ट्रा क्लॅरिटी, मोशन फोटो आणि ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ मोड सारख्या एआय फीचर्स देखील आहेत. याशिवाय Realme 16x 5G यात Wi-Fi, 5G, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि कंपनीचे इन-हाऊस फ्लक्स इंजिन देखील आहे.
Realme 16x 5G फोनला IP65 रेटिंग देण्यात आले आहे, जे धूळ आणि पाण्याच्या हलक्या वर्षावापासून त्याचे संरक्षण करते. Realme 16x 5G यात MIL-STD-810 मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स देखील आहे.

