Headlines

Gaurav Mehta Jaipur Watch Company Success Story; कार विकून 30 लाखांत सुरू केला 25 कोटींचा व्यवसाय, भारतातील पहिला कस्टम अन् लक्झरी घड्याळ ब्रँड; PM मोदींच्याही पसंतीचा

Success Story of Gaurav Mehta: जयपूरचे रहिवासी गौरव मेहता यांनी आपल्या मालकीची गाडी विकून 30 लाखांमध्ये भारतातील पहिला-वहिला कस्टमाइज्ड घड्याळांचा व्यवसाय सुरू केला. हा ब्रँड 40 हून अधिक देशांमध्ये विस्तारला असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल कमावतो.

Gurav Mehta Jaipur Watch Company Success Story
कार विकून 30 लाखांत सुरू केला 25 कोटींचा व्यवसाय, भारतातील पहिला कस्टम अन् लक्झरी घड्याळ ब्रँड
Success Story: आपल्या आवडी-निवडीनुसार कपडे आणि दागिने बनवता येत असतील, तर मनगटावरच घड्याळ का नाही? हाच विचार आणि wristwatch बद्दलची आवड या दोन गोष्टींनी गोष्टींनी जयपूरच्या गौरव मेहता यांना अनोखा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली. लक्झरी घडाळ्याच्या सेक्टरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये टायटनने आघाडी मिळवली आहे, पण गौरव मेहता यांनी 2013 मध्ये ‘जयपूर वॉच कंपनी’ सुरू केली जी जुनी नाणी, टपाल तिकिटे, चित्रे आणि अनोख्या डिझाइन्सचा वापर करून आपल्या आवडीनुसार घड्याळे तयार करते.

छंदाचे व्यवसायात रूपांतर

छंदाचे व्यवसायात रूपांतर

व्यवसायाच्या सुरुवातीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि त्यावेळी, भारतातील उच्च श्रेणीच्या घड्याळांच्या बाजारात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. याशिवाय भारतीय घड्याळे परदेशी ब्रँड्सइतकी चांगली नसतात, असाही एक समज होता, पण तरीही गौरव यांनी आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याचा निर्धार केला.

गाडी विकून 30 लाख रुपये व्यवसायांत गुंतवले

गाडी विकून 30 लाख रुपये व्यवसायांत गुंतवले

2013 मध्ये गौरव यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या गॅरेजमधील गाडी विकून 30 लाख रुपये उभे केले. गौरव यांनी आपली BNW कार विकली आणि मित्रांकडून पैसे उसने घेतले. सुरुवातीला घड्याळ बनवण्याची कला समजून घेण्यासाठी त्याने नाणे तज्ञ आणि घड्याळ निर्मात्यांसोबत काम करून सखोल संशोधन केले.

फेसबुकवर झालेली पहिली विक्री

फेसबुकवर झालेली पहिली विक्री

2013 मध्ये गौरवने जयपूर वॉच कंपनीच्या नावे फेसबुक पेज तयार केले आणि सशुल्क जाहिरात चालवायला सुरुवात केली. दिल्लीतील एका ग्राहकाने घड्याळे न पाहताच 2 घड्याळे खरेदी केली बुक केली, ज्यामुळे गौरवला मोठे प्रोत्साहन मिळाले.

23000 रुपयांचे कलेक्शन विकले

23000 रुपयांचे कलेक्शन विकले

त्यानंतर, मुंबईतील एका बड्या कलेक्टिबल्स वस्तूंच्या दुकानाने जयपूर वॉच कंपनीने बनवलेली घड्याळे विकायला सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यात अंदाजे 23000 रुपयांचा पहिले कलेक्शन विकले. त्यानंतर ताज आणि ओबेरॉय ग्रुपच्या काही हॉटेल्समध्ये घड्याळे विकणे सुरू केले. 2015 मध्ये बेंगळुरूमध्ये एक उत्पादन युनिट उभारण्यासाठी अंदाजे 1.2 कोटींची गुंतवणूक केली, जी 2017 मध्ये नफ्यात आली.

जयपूर वॉच कंपनीच्या घडाळ्यांचे वैशिष्ट्य

जयपूर वॉच कंपनीच्या घडाळ्यांचे वैशिष्ट्य

जुनी नाणी, हाताने रंगवलेली चित्रे, टपालाची तिकिटे, देव-देवतांच्या प्रतिमा, सुलेखन आणि मौल्यवान खड्यांनी सजवलेल्या डायल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसाठी जयपूर वॉच कंपनीची उत्पादने ओळखली जातात.

जयपूर वॉच कंपन्यांच्या घडाळ्यांची किमती किती

जयपूर वॉच कंपन्यांच्या घडाळ्यांची किमती किती

या घडाळ्यांची किंमत अंदाजे 15,000 रुपये ते 24 लाख रुपयांपर्यंत असून 24 लाखांचे घड्याळ एका विशेष ग्राहकासाठी बनवलेले, ज्यामध्ये सोने आणि हिऱ्यांपासून फुलासारखी रचना तयार केली गेलेली. कंपनीने किंग जॉर्ज सहावे यांच्या जुन्या नाण्यांचा वापर करून 35 घड्याळांचा संग्रह देखील तयार केला तर, जयपूरचे महाराजा सवाई मानसिंग दुसरे यांच्या जुन्या नाण्यांपासून 50 घड्याळांचे कलेक्शन बनवले आहे.

पंतप्रधान मोदींच्या मनगटावर झळकले घड्याळ

पंतप्रधान मोदींच्या मनगटावर झळकले घड्याळ

2025 च्या अखेरीस गौरवच्या व्यवसायात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला. यावेळी, पंतप्रधानांच्या मनगटावर जयपूर वॉच कंपनीचे घड्याळ प्रसार माध्यमांमध्ये झळकले. सुरुवातीला गौरवला विश्वास बनला नाही, पण त्यानंतर टीमने अधिकृत फोटो तपासले आणि पंतप्रधानांच्या मनगटावर त्यांच्याच ब्रँडचे घड्याळ असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ही कोणतीही सशुल्क जाहिरात मोहीम, सेलिब्रिटींची जाहिरात किंवा जनसंपर्क मोहीम नव्हती पण त्यानंतर, कंपनीची ऑनलाइन मागणी झपाट्याने वाढली आणि पहिल्यांदाच ऑनलाइन विक्रीने ऑफलाइन किरकोळ विक्रीला मागे टाकले.

40 हून जास्त देशांमध्ये विस्तारलाय व्यवसाय

40 हून जास्त देशांमध्ये विस्तारलाय व्यवसाय

कंपनीच्या व्यवसायापैकी सुमारे 70% व्यवसाय ऑनलाइन विक्रीतून होतो, तर स्वित्झर्लंड आणि जपानसह 40 हून अधिक देशांमधून कंपनीला ऑर्डर्स मिळतात. कंपनीने गेल्या वर्षी सुमारे 25 कोटींचा महसूल नोंदवला असून यावर्षी 75 ते सुमारे 80 कोटी रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा