मेट्रोमध्ये प्रवास करत असताना आलेल्या या आयडियाने आज हजारो कोटींच्या बिझनेसचे स्वरूप घेतले आहे. 2018 साली तीन मित्रांनी पॉकेट एफएम नावाची संकल्पना आखली होती. रोहन नायक, निशांत केएस आणि प्रतीक्षा दीक्षित या तीन मित्रांनी आपल्या हटके क्रिएटिव्हिटीच्या जोरावर पॉकेट एफएम नावाच्या वादळाची सुरुवात केली. आज 20 पेक्षा जास्त देशांमध्ये घोंघावत असणाऱ्या या वादळाने सुरुवातीचे काही महिने मोठ्या अपयशाचा सामना केला. 2018 साली सुरु केलेला ऑडिओ प्लॅटफॉर्म काही केल्या झेप घेताना दिसत नव्हता, पण दिवाळी 2019 च्या मुहूर्तावर प्लॅटफॉर्मने उंच भरारी घेण्यास सुरुवात केली.
दिल्ली मेट्रोमधील लांबलचक कंटाळवाण्या प्रवासात विरंगुळा म्हणून ऑडिओ प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला होता. आधी या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह बातम्या तसेच विविध पॉडकास्ट सुरु करण्यात आले. पण श्रोत्यांनी त्यात फार काही रस घेतला नाही, कारण लाईव्ह बातम्या आणि पॉडकास्ट सेवा देणारे एफएम आधीपासूनच अस्तित्वात होते, मग ‘पॉकेट एफएम’ मध्ये काय नवीन?
आपण काय चुकतोय? आणि आपण आपल्या श्रोत्यांना आणखीन काय देऊ शकतो? या सर्व गोष्टींचा विचार करून पॉकेट एफएममध्ये ‘फिक्शन बेस्ड ऑडिओ सिरीज’ चा हटके प्रवास सुरु झाला. येथे खरे नशीब उजळले. या संकल्पनेला श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला. पॉकेट एफएम मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. श्रोत्यांची संख्या वाढू लागली. त्यांनतर एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कंटेंटने प्लँटफॉर्मच्या वाढीत मोठा हातभार लावला.
आज पॉकेट एफएमच्या संग्रहात 1 लाखांहून अधिक तासांचा कंटेंट उपलब्ध आहे. तसेच 75 हजारांहून जास्त ऑडिओ सिरीज आहेत. एका मेट्रोमध्ये आलेल्या संकल्पनेपासून तयार झालेल्या या प्रवासाने आज 7,150 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्लॅटफॉर्ममध्ये हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवघ्या 8 वर्षांमध्ये पॉकेट एफएमने फार मोठे यश मिळवले आहे.
प्लास्टिकच्या नोटांना अखेर मंजुरी, ३० वर्षांपर्यंत काहीच होणार नाही! बाजारात कधीपासून येणार? सर्व समजून घ्याफक्त भारत नाही तर परदेशातही चालते चर्चा!
आज पॉकेट एफएम फक्त भारतात ऐकले जात नाही, तर जगभरातील एकूण 25 देशांमध्ये पॉकेट एफएमचे श्रोते आहेत. या देशांमध्ये अमेरिका, लॅटिन अमेरिका तसेच युरोप या देशांचाही समावेश आहे.

