Headlines

CNG, hybrid, EV sales are on par with petrol cars, emphasis on total cost, not mileage


  • Marathi News
  • National
  • CNG, Hybrid, EV Sales Are On Par With Petrol Cars, Emphasis On Total Cost, Not Mileage

नवी दिल्ली1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय कार ग्राहकांची पसंती वेगाने बदलत आहे. आता ते केवळ गाडी किती मायलेज देते हे पाहत नाहीत. गाडी खरेदी करणे, ती चालवणे, देखभाल आणि विकेपर्यंत किती एकूण खर्च येईल याचाही हिशेब लावत आहेत. यामुळेच देशात पहिल्यांदाच पेट्रोल कारच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळत आहे.

‘फाडा’च्या मते, जुलैमध्ये सीएनजी, हायब्रिड व स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या कारचा बाजारातील वाटा ४०.५९% पर्यंत वाढला, तर पेट्रोल कारचा वाटा घसरून ४१.६८% राहिला. या दोन्हींमध्ये आता केवळ १.०९% चा फरक उरला आहे. एका वर्षापूर्वी पेट्रोल कारचा वाटा पर्यायी कारपेक्षा १८.२% जास्त होता.

ईव्हीची विक्री ८२% वाढली

जुलैमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वार्षिक आधारावर ८२% वाढली. आता ईव्हीचा वाटा ७.९% झाला आहे. सीएनजीचा वाटा २४.६७% आणि हायब्रिडचा ८.०२% राहिला. तर, डिझेल कारचा वाटा १७.७३% राहिला. दुचाकी बाजारातही ईव्हीचा वाटा विक्रमी ११.२४% वर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी हा ७.६५% होता.

६ वर्षांत बदलले चित्र

२०२० मध्ये पेट्रोल कारचा वाटा ६६.७% होता. सीएनजी, हायब्रिड, ईव्हीचा एकत्रित वाटा ११.८% होता. सहा वर्षांत पर्यायी कारचा वाटा चार पटींनी वाढला आहे, तर पेट्रोल कारचा वाटा कमी झाला आहे. गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्री वार्षिक आधारावर २५.८९% वाढून २५.९१ लाख झाली आहे.

इंधन महागल्याने सीएनजीची मागणी

मारुती सुझुकीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पार्थो बॅनर्जी यांच्या मते, इंधनाचे दर वाढल्याने सीएनजी गाड्यांची मागणी वाढली आहे. एसयूव्ही खरेदीदारही सीएनजीला पसंती देत आहेत. काही एसयूव्ही मॉडेल्सची निम्म्याहून अधिक विक्री ‘अंडरबॉडी सीएनजी’ व्हेरियंटची होत आहे.

भास्कर एक्स्पर्ट रवी भाटिया, प्रेसिडेंट, जॅटो डायनेमिक्स

ईव्हीचे कमी दरही आकर्षित करताहेत

इंधनाच्या वाढत्या किमती, चार्जिंग पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि कमी होणारा खर्च ही ईव्हीची मागणी वाढण्याची कारणे असू शकतात. अलीकडच्या वर्षांत हायब्रिड आणि सीएनजी मॉडेल्सची विक्रीही वाढली आहे. याचा अर्थ गाडी कोणती खरेदी करायची याचा निर्णय आता केवळ मायलेजवरून होत नाही. ग्राहक आता खरेदीपासून ते देखभाल आणि पुढे विकेपर्यंतचा एकूण खर्चही पाहतात. याचा अर्थ असा नाही की पेट्रोल मॉडेल संपुष्टात येत आहेत, तर पॉवरट्रेनचे (इंजिन) पर्याय वेगाने वाढले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत