Headlines

FPI Stake In Indian Share Market Fallen And Impacted Shares ; FPI In Share Market : परदेशी गुतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास कमी होतोय, 14 वर्षांचा गाठला नीचांक; याचा अर्थ काय?


भारतीय शेअर बाजारात बरेचसे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. परंतु, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील हा कल घसरल्याचे दिसत आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरून विश्वास उडत आहे की काय? असा प्रश्न येथे तयार झाला आहे, कारण FPI ने गेल्या 14 वर्षातील नीचांक गाठला आहे. गेल्या 14 वर्षांत FPI कधीच इतका घसरला नव्हता.

FPI In Share Market
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ( FPI ) म्हणजे परदेशातील एखादी अशी कंपनी, संस्था किंवा गुंतवणूकदार, जे भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवतात. अनेक परदेशी कंपन्या किंवा गुंतवणूकदार मंडळी आहेत, जे भरतोय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात रस घेतात. या परदेशी कंपन्या किंवा गुंतवणूकदार मंडळींच्या भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीला FPI असे म्हणतात. सध्या FPI संबंधित दोन महत्वाच्या बातम्या आल्या आहेत. वाईट बातमी म्हणजे FPI चा भारतीय बाजारातील गुंतवणुकीचा टक्का घसरला आहे. भारतीय शेअर बाजारातील FPI ची मालकी कमी झाली आहे. तर त्याचबरोबर एक दिलासादायक बातमी अशी आहे की अजूनही भारतीय शेअर बाजारात FPI च्या गुंतवणुका आहेत आणि ज्या कंपन्यांमध्ये FPI च्या गुंतवणुका आहेत, त्या कंपन्यांनी उत्तम रिटर्न्स दिले आहेत.

FPI ची हालचाल अन् शेअर बाजारावर परिणाम

भारतीय शेअर बाजारातील FPI ची एकूण हिस्सेदारी कमी झाली आहे. ती गेल्या 14 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहचली आहे. महत्वाचे म्हणजे FPI ने भारतीय शेअर बाजारातील एकूण 990 कंपन्यांमधून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे 756 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी वाढवलीसुद्धा आहे. ज्या कंपन्यांमध्ये FPI ने हिस्सेदारी वाढवली आहे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 39.57% बदल दिसून आला. तर ज्या कंपन्यांमधून FPI ने हिस्सेदारी कमी केली त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये सरासरी 23.71% बदल दिसून आला. एकंदरीत, मुख्य मुद्दा असा आहे की जिथे FPI ने गुंतवणूक वाढवली त्या शेअर्सच्या किमतीत गुंतवणूक कमी करण्यात आलेल्या शेअर्सच्या किंमतीपेक्षा जास्त बदल नोंदवण्यात आला आहे.

FPI च्या हालचालीचा Promoters पेक्षा मोठा परिणाम

FPI सह प्रमोटर्स यांनीही शेअर बाजारात मोठी हालचाल घडवून आणली आहे. परंतु, प्रमोटर्स यांच्या Entry-Exit मुळे शेअर बाजारात घडून आलेला बदल हा FPI च्या हालचालींइतका तीव्र नव्हता. प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे मालक किंवा कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारे प्रमुख भागीदार. ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटर्स यांनी हिस्सेदारी वाढवली, त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 35.67% बदल नोंदवण्यात आला. तर ज्या कंपन्यांच्या शेअर्समधून प्रमोटर्स यांनी हिस्सेदारी कमी केली, त्या कंपन्यांच्या शेअर्स प्राईजमध्ये 32.61% बदलीची नोंद झाली. एकंदरीत, हे परिणाम FPI च्या हालचालींमुळे झालेल्या बदलाइतके तीव्र जरी नसले तरी तेही फार महत्वाचे आहेत.

Maharashtra TimesMilk Price Hike : वाढत्या डिझेलच्या किंमतीचा फटका दुधाला! पनीर, दही, ताक महागणार; दोन दिवसांत नव्या किंमती होणार लागूभारतीय शेअर बाजारातून FPI चा टक्का घसरला

31 मार्च 2026 रोजी जारी झालेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाही निकालातील आकड्यांनुसार भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांची हिस्सेदारी (FPI) 16.12% होती. तर 31 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाही निकालातील आकड्यांनुसार भारतीय शेअर बाजारातील FPI 15.88% इतका होता. एकंदरीत, दुसऱ्या तिमाहीत भारतीय शेअर बाजारातील FPI चा आकडा 0.24 पॉईंट्सने घसरला आहे. FPI चा हा आकडा गेल्या 14 वर्षांतील सगळ्यात कमी आकडा आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा