Royal Indian Families Net Worth: भारतातील अनेक राजघराणे आलिशान हॉटेल्स, संग्रहालये आणि स्मार्ट व्यावसायिक उपक्रमांच्या माध्यमातून आजही आपला वारसा जतन करत आहेत. जोधपूर, जयपूर आणि बडोदा येथील घराणी पर्यटन, स्थावर मालमत्ता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढवत आहेत, ज्यांची एकत्रित संपत्ती हजारो कोटींमध्ये आहे.

जोधपूरचे राजघराणे
जोधपूरचे राजघराणे 22,400 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत भारतातील सर्वात श्रीमंत राजघराणे आहे. जोधपूर राजघराण्याच्या मालकीचा भव्य उम्मेद भवन पॅलेसचा एक भाग ताज लक्झरी हॉटेल म्हणून कार्यरत असून हे राजघराणे पर्यटन, संग्रहालयाची तिकिटे, मोठ्या स्थावर मालमत्ता आणि विशेष कार्यक्रमांमधून उत्पन्न मिळवते. या मारवाड राजघराण्याने काळजीपूर्वक जतन करून आपल्या ‘ब्लू सिटी’चा वारसा जपताना राजपूत परंपरेनुसार त्यांनी किल्ल्यांना उत्पन्नाचे साधन बनवले.
जयपूरचे राजघराणे
20000 कोटींची Net Worth असलेले जयपूरचे राजघराणे सिटी पॅलेस आणि ताजच्या रामबाग पॅलेसमध्ये निवास व्यवस्था उपलब्ध करून देऊन Airbnb द्वारे महसूल मिळवते. तसेच पोलो स्पॉन्सरशिप, पर्यटन आणि विशेष शाही अनुभवांमधूनही या राजघराण्याला उत्पन्न मिळते. कछवाहा कुटुंब इतिहास आणि आदरातिथ्य यांचा मेळ घालून ‘पिंक सिटी ’चे वातावरण जपते जेणेकरून जगभरातील पर्यटकांना आमेर किल्ल्यावरील वारसा स्थळाकडे आकर्षित करता येईल.
वडोदराचे गायकवाड घराणे
वडोदराच्या गायकवाड राजघराण्याकडे बकिंगहॅम पॅलेसच्या चौपट आकाराच्या लक्ष्मी विलास पॅलेससह एकूण 20000 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकी आहे. इतकेच नाही तर विस्तीर्ण जमिनी, मंदिर विश्वस्त संस्था आणि अमूल्य कला संग्रहालयांमधून या राजघराण्याने प्रामुख्याने संपत्ती कमावली आहे. गुजराती घराणे संस्कृतीत गुंतवणूक करते आणि वडोदराच्या आधुनिक विकासाच्या काळातही गायकवाड घराण्याची भव्यता टिकवून ठेवते.
मेवाडचे राजघराणे
फतेह प्रकाश पॅलेस आणि सिटी पॅलेस म्युझियम यांसारख्या एचआरएच ग्रुपच्या हॉटेल्ससह मेवाडच्या राजघराण्याकडे अंदाजे 10000 कोटींची संपत्ती आहे. पर्यटन, सांस्कृतिक महोत्सव आणि संस्थांकडून मिळणारे अनुदान या राजघराण्याच्या साम्राज्याला चालना देतात. उदयपूरचे सिसोदिया घराणे आपल्या तलाव आणि राजवाड्यांच्या भव्यतेचा आदर करते, ज्यामुळे मेवाड जगभरातील प्रवाशांसाठी एक रोमँटिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनले आहे.
म्हैसूरचे वाडियार घराणे
राजवाडा पर्यटन, प्रसिद्ध म्हैसूर सिल्क, मंदिर विश्वस्त संस्था आणि कर्नाटकातील स्थावर मालमत्तेच्या भाड्यातून वाडियार घराण्याने 10000 कोटी रुपयांची संपत्ती मिळवली आहे. दक्षिणेकडील घराणे विशेषतः दसऱ्याच्या काळात चर्चेत असते.
अलसीसर राजघराणे
अलसीसर राजघराण्याकडे 3000 कोटी रुपयांची संपत्ती असून अलसीसर पॅलेस हेरिटेज हॉटेल त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. तसेच येथे ‘मॅग्नेटिक फील्ड्स’ या संगीत महोत्सवाचे आयोजनही केले जाते. पर्यटन भागीदारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वारसा राजस्थानमध्ये आजही टिकून आहे.
पतौडींची संपत्ती किती
वारशाने मिळालेले राजवाडे आणि मालमत्ता यांच्या माध्यमातून पतौडी नबाबांची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये इतकी आहे. बॉलीवूड (सैफ अली खान), ब्रँड एंडोर्समेंट्स (जाहिराती) आणि आधुनिक काळातील मालमत्तेचे भाडे यामधून या घराण्याने संपत्ती कमावली आहे.
महाराष्ट्रातील श्रीमंत राजघराणे
भोसले घराण्याची 500 कोटींची संपत्ती महाराष्ट्रातील इस्टेटी, मंदिर विश्वस्त संस्था आणि सांस्कृतिक मालमत्तेशी निगडित असून ऐतिहासिक मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन करून या घराण्याच्या विविध पिढ्यांनी मराठा परंपरांचे जतन केले आहे.

