Headlines

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये सूत्रसंचालक पदी माधुरी दीक्षितची वर्णी| Maharashtra Times


मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. पण या वेळी या शोमध्ये मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे. इतकी वर्ष या शोच्या सीझनचे सूत्रसंचानल अभिनेते सचिन खेडेकर करत होते. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच एक अभिनेत्री या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या. त्यामुळे ही अभिनेत्री कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली.

आता या गुलदस्त्यावरुन पडदा उठला आहे. या सीझनमध्ये महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या येण्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे आणि नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे कारण ‘आता खेळ बदलणार’…

Maharashtra TimesParesh Rawal Support Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना संरक्षण द्या, त्यांची बदली नको; परेश रावल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती
महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचलिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.

ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा, सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ देणारा आणि प्रत्येक प्रश्नातून आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणांचा, आशांचा आणि नव्या शक्यतांचा उत्सव ठरणार आहे.

Maharashtra TimesAmit Rai Chhatrapati Shivaji Maharaj Film : इतिहास ब्रिटिशांनी लिहिला असता तर वेगळा असता! बॉलिवूड दिग्दर्शक ऐतिहासिक नोंदींच्या आधारे करणार छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा
‘कोण होणार करोडपती’ एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे. ज्ञानाची, जिद्दीची आणि स्वप्नांची परंपरा कायम असली तरी यंदा माधुरी दीक्षित यांच्या येण्यानं या मंचावर नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा आणि एक वेगळी उब अनुभवायला मिळणार आहे… कारण ‘आता खेळ बदलणार…!’

IMG

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करून आहे. ज्ञानाच्या बळावर सामान्य माणूस आपली असामान्य स्वप्नं कशी पूर्ण करू शकतो याचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. जिद्दीचा, चिकाटीचा आणि ‘एका संधीमुळे आयुष्य बदलू शकतं’ या विश्वासाचा हा कार्यक्रम आहे.बरेचदा अनेकजण हुशार, बुद्धीमान असूनही परिस्थितीच्या अभावी आपली स्वप्न पूर्ण करु शकत नाही. अशावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम या माणसांच्या कलागुणांना वाव देतात. आजपर्यंत या शोमुळे अनेकांचे आयुष्य पालटले आहे. याशिवाय सर्वसामान्यांचा एक वेगळा संघर्षही जगासमोर येतो. तसेच शिक्षण व सामान्य ज्ञान किती महत्वाचे आहे हे यामुळे समजते. आता माधुरी दीक्षित स्पर्धकांना कशी खिळवून ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा शो कधी सुरू होणार हे अद्याप समोर आले नसली तरी सोशल मीडियावर प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित बद्दल बोलायचे झाल्यास तिने यापूर्वी बऱ्याच नृत्याच्या कार्यक्रमांचे परीक्षण केले आहे. ज्यामध्ये डान्स दिवाने, झलक दिखला जा यांसारख्या शोचा समावेश आहे. पण कोण होणार करोडपती अशा प्रकारच्या शोचे सूत्रसंचालन करण्याची ही तिची पहिलच वेळ आहे. यापूर्वीचे बरेच सीझन सचिन खेडेकर सूत्रसंचालित करत होते. मध्यंतरी नागराज मंजुळे सुद्धा सूत्रसंचालक म्हणून दिसले होते.

सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर कोण होणार मराठी करोडपतीचा जो प्रोमो शेअर केला गेला आहे त्यात माधुरी दीक्षित मराठमोळ्या लुकमध्ये दिसते. ती छान हिरवी पैठणी परिधान केली आहे. नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, केसांचा अंबाडा अन् त्यावर गजरा असा तिचा लुक पाहून चाहतेही मोहित झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत