Chhatrapati Sambhajinagar Air Pollution: पावसामुळे धूळ, माती; तसेच सर्व प्रकारचे धुलिकण खाली बसतात आणि त्यामुळे हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) कमी होतो. साहजिकच हवेतील प्रदूषण कमी होत नाही, पण हवेतील धुलिकण कमी झाल्यामुळे शहरवासीयांचा त्रास कमी होतो.

एक्यूआय जुलै महिन्याच्या पहिल्या १५पंधरा दिवसांत दिसून आले आणि त्यामुळेच या काळात शहराचा एक्यूआय हा ५५ ते ७९ पर्यंत होता. जुलैच्या उत्तरार्धात काही अंशी कमी झालेल्या पावसामुळे दहा दिवस १०० ते ११६ पर्यंत गेला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांमध्ये कमी-अधिक पावसामुळे एक्यूआयमध्ये काहीअंशी घट झाली व हाच एक्यूआय ७९, ९०, ९५ पर्यंत होता. मात्र चार ऑगस्टपासून पुन्हा १०६, १०७, ११३, ११२ या प्रमाणे एक्यूआय सलग वाढत आहे. शनिवारी तो ११४ पर्यंत पोहोचल्याचे संकेतस्थळावरून स्पष्ट झाले.
Marathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना?अर्धवट कामांचा फटका
शहर परिसरात पाऊस कमी होताच हवेमध्ये खूप जास्त प्रमाणात धुलिकण मिसळून एक्यूआय लगेच शंभरच्या पुढे जात असल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे. ‘खरे म्हणजे हा खड्ड्यांचा व अर्धवट कामांचा परिणाम आहे,’ याकडे लक्ष वेधून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सतीश पाटील म्हणाले, ‘मागच्या अनेक दिवसांपासून संपूर्ण शहरात वेगवेगळ्या कामांसाठी जागोजागी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत व अनेक दिवस खड्डे, माती, धूळ तशीच असते. त्यामुळे हीच माती, धूळ हवेत सतत मिसळत असते. त्याचाच परिणाम म्हणून एक्यूआय वाढलेला दिसतो.’
Pune Crime : गावात रुबाबासाठी नको ते केलं! एअर फोर्सचा जवान सांगून वर्दी शिवायला, टेलरमुळे बिंग फुटलं; पुण्यात तरुणानं शहीद जवानाचं आयकार्ड वापरलंसद्यस्थितीत शहर परिसरात विविध रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्त्यांच्या आजा खोदन आजूबाजूलाही खोदून ठेवले आहे. पुन्हा किती तरी दिवस ही कामे सुरू असतात. त्यामुळे धूळ, माती सतत उडत असते. ही कामे वेळेत पूर्ण होण्याबरोबरच रस्त्यालगत झुडुपे; तसेच झाडी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय सर्वच रस्त्यांची साफसफाई होणेही महत्त्वाचे वाटते.- मिलिंद गिरधारी, पर्यावरणप्रेमी
धूळ, माती शोषून घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात झाडांची गरज आहे. तुलनेने ही झाडी कमी प्रमाणात आहे. पुन्हा ठिकठिकाणी कामांसाठी केलेले खड्डे, माती, वाळू ही रस्त्यांलगत पडून असते. त्याचा परिणाम म्हणून हवेत धुलिकण जास्त प्रमाणात मिसळून एक्यूआय वाढतो, जो कमी करणे नक्कीच शक्य आहे.-डॉ. सतीश पाटील, पर्यावरणतज्ज्ञ

