![]()
‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेनुसार मविप्र संस्था संचलित येथील होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी निफाड पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. शालेय अभ्यासक्रमातील ‘गुन्हेगारी प्रणाली पद्धत’ व ‘ग्रामीण प्रशासन’ या पाठांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित सोनावणे, पोलिस हवालदार नितीन सांगळे व सायबर क्राईमचे पोलिस शिपाई अरविंद ढवळे यांनी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याची विभागवार रचना, शस्त्रागार, पोलिस कोठडी, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आणि गुन्ह्यांची उकल करण्याच्या पद्धतीची माहिती दिली. आरोपींना पकडण्यासाठी इतर पोलिस स्टेशनची मदत कशी घेतली जाते, विविध गुन्ह्यांसाठी कोणती कलमे लावली जातात, पोलिस ठाण्याच्या हद्दीत किती गावे येतात, पोलिसांची पदतालिका कशी असते, तसेच पोलिसांना लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ का म्हटले जाते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून पोलिसांच्या कामकाजाबाबत जाणून घेतले. विद्यार्थ्यांना शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे, विषय शिक्षक प्रवीण काळे, सतीश रायते, अमोल हळदे, शीतल केदारे, शुभदा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
Source link
पोलिसांच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती:होरायझन अ कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिली निफाड पाेलिस ठाण्याला भेट
