Headlines

मागण्यांवर आंदोलक ठाम! झारखंड सरकारसोबत चर्चा अपयशी; नोकरभरती गैरव्यवहाराविरोधात आंदोलन सुरुच


वृत्तसंस्था, रांची: झारखंडमधील नोकरभरती परीक्षांमध्ये पेपरफुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, राज्य सरकारने शनिवारी विविध संघटनांशी चर्चा केली. मात्र, आंदोलकांनी आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोंडी फोडण्यात अपयश आले.

राज्यातील मंत्र्यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय समितीने प्रथम ‘जेएलकेएम’चे नेते देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वाखालील गटाची भेट घेऊन चर्चा केली. महतो यांच्या उपोषणाचा शनिवारी सातवा दिवस होता. त्यानंतर समितीने काँग्रेसप्रणित एनएसयूआय, एसीएस आणि जेसीएमच्या शिष्टमंडळांची स्वतंत्रपणे भेट घेतली. सरकारने शुक्रवारी रात्री ‘जेपीएससी/जेएसएससी रिफॉर्म्स मंचा’च्या शिष्टमंडळाशी अशाच प्रकारची चर्चा केली होती.

Maharashtra Timesकधीच पाठिंबा देणार नाही! शहांच्या ‘मिशन 360’ला दक्षिणेतून धक्का; महत्त्वाकांक्षी विधेयक लटकणार?सरकारी समितीची पहिली बैठक महतो यांच्या ‘जेपीएससी जेएसएससी कँडिडेट्स मंचा’शी झाली. ती सुमारे दोन तास चालली. ‘आमच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र, १४व्या जेपीएससी परीक्षा रद्द करण्यासह सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील,’ असे मंचाच्या एका नेत्याने सांगितले.

सत्ताधारी ‘जेएमएम’प्रणित झारखंड छात्र मोर्चाने (जेसीएम) १४व्या झारखंड पीएससी नागरी सेवा परीक्षा रद्द करण्यासह पाच मागण्या मांडल्या. एनएसयूआयने सर्व संशयास्पद जेपीएससी, जेएसएससी परीक्षांची ९० दिवसांत सीआयडी चौकशी करावी, राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या धर्तीवर झारखंड चाचणी संस्था (जेटीए) स्थापन करावी आदी सहा मागण्या केल्या, असे संघटनेचे प्रवक्ते संजीव शहा यांनी सांगितले.अनियमितता आढळलेल्या परीक्षा रद्द करण्यासह भरती परीक्षांमध्ये आदिवासी आणि प्रादेशिक भाषांचा पात्रता विषय म्हणून समावेश करण्याची मागणी आदिवासी छात्र संघाचे नेते कार्तिक ओराव यांनी केली.

जेपीएससी परीक्षांमधील अनियमिततेसंदर्भात आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली असून जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांची चार वेळा चौकशी करण्यात आली आहे.

Maharashtra TimesMysterious Well: विहिरीत समुद्रासारख्या लाटा, पाणी जोरजोरात उसळू लागलं; ग्रामस्थ घाबरले, तपासातून गूढ उकललं‘आयसा’चा वेगळा मंच

झारखंड भरती परीक्षांमधील गैरप्रकारांवरून आंदोलन तीव्र करण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (आयसा) शनिवारी येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडिअममध्ये आपला वेगळा मंच उभारला. यामुळे स्टेडिअममधील आंदोलकांच्या मंचांची संख्या तीन झाली. ‘आम्ही वेगवेगळ्या मंचांवरून लढत असू, पण १४व्या जेपीएससी व जेएसएससी-सीजीएल परीक्षा रद्द करणे, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे या आमच्या मागण्या एकच आहेत,’ असे ‘आयसा’ रांचीचे अध्यक्ष विजय कुमार यांनी सांगितले. ‘आयसा’ सदस्य १० ऑगस्ट रोजी संघटनेचे बॅनर न घेता मोठ्या गटाच्या मोर्चात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म्स मंच आणि जेपीएससी-जेएसएससी कँडिडेट्स फोरम हे २५ जुलैपासून आंदोलन करत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत