Headlines

कुडाळ आत्मा समितीच्या अध्यक्षपदी मंगेश प्रभू


शहर वार्ताहर/कुडाळ : कुडाळ तालुका शेतकरी सल्लागार समिती (आत्मा ) च्या अध्यक्षपदी तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू यांची निवड करण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी कार्यालया च्यावतीने शेतकरी सल्ला समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते ही निवड करण्यात आली. निवड कालावधी हा 2026 ते 2028 वर्षे आहे.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसवर्धन सभापती दादा साईल, जि. प. सदस्य दिपक नारकर, रुपेश कानडे, नागेश आईर व गंगाराम सडवेलकर, जि. प. सदस्या दीपलक्ष्मी पडते, आरती पाटील व सुप्रिया वालवलकर, तालुका कृषी अधिकारी श्री. चौगुले, श्री. गोसावी तसेच तालुक्यातील निवड करण्यात आलेले वीस शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत शेती विकास, विविध कृषी योजना, पीक व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सूचना व समस्यांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा संवादात्मक बैठका अधिक प्रभावी ठरून कृषी क्षेत्राच्या विकासाला निश्चितच चालना देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत